पेटीएमने 1000 कर्मचार्‍यांना दिलं नारळ, खर्चात 15% कपात करण्यासाठी कामावरुन काढलं!

पेटीएमच्या विविध विभागांमधून 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. कर्मचारी खर्च 15 टक्क्यांनी कमी करण्यासाठी टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

    काही महिण्यापुर्वी अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. आता सरत्या वर्षात पुन्हा एका मोठ्या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सने कर्मचार्‍यांचा खर्च 15 टक्क्यांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेटीएमच्या विविध विभागांमधून 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून टाळेबंदीचा भाग म्हणून देयके, कर्ज देणे, ऑपरेशन्स आणि विक्री या विभागांवर परिणाम झाला आहे. अहवालानुसार, कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे दहा टक्के कामगारांना टाळेबंदीचा फटका बसला आहे.

    भारतीय स्टार्टअपची सर्वात मोठी कर्मचारी कपात

    पेटीएमच्या या कर्मचारी कपातमुळे त्याच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे 10 टक्के प्रभावित झाले आहेत. कोणत्याही भारतीय स्टार्टअपमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात मानली जात आहे. 2023 हे स्टार्टअप कंपन्यांसाठीही चांगले वर्ष ठरले नाही. या वर्षी, भारतीय स्टार्टअप्सनी पहिल्या तिमाहीत 28 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. याआधी 2022 मध्ये स्टार्टअप कंपन्यांनी 20 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते आणि 2021 मध्ये 4 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते.