Pm Modi In His Last Speech In The 17th Lok Sabha Thanked All Mps Elaborated On Many Topics Read Important Points From Speech Nryb
पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील शेवटच्या भाषणात मानले सर्व खासदारांचे आभार; अनेक विषयांवर विस्तृत विवेचन; वाचा महत्त्वाचे मुद्दे
लोकसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र यांनी गेल्या पाच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडला. त्यासोबत घेतल्या गेलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आणि नव्याने केलेल्या कायद्यांचा मोदींनी भाषणामध्ये उल्लेख केला. अनेक विषयांवर विस्तृत विवेचन करीत कोरोना काळात सर्व खासदारांनी केलेल्या सहकार्यबद्दल आभार मानले.
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 लोकसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाषण केले. लोकसभेतील नरेंद्र मोदी यांचे हे शेवटचं भाषण आहे. कारण आता लवकरच निवडणुका होणार असून, एप्रिल महिन्यात निवडणुकांच्या होतील अशा चर्चा आहे. यावेळी बोलताना मोदींनी 17 लोकसभेमध्ये गेल्या पाच वर्षांत घेतल्या गेलेल्या निर्णय आणि कायद्यांबाबत माहिती दिली. या कार्यकाळात परिवर्तनात्मक सुधारणा झाल्याचे सांगत भारत हा जगासाठी रिसर्च हब बनेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
17 व्या लोकसभेने अनेक रेकॉर्ड केले आहेत, देश भरभरून आशीर्वाद देत राहील. भारत आणि लोकशीहीची यात्रा अनेक काळापर्यंत असेल. एक प्रकारे आज आपल्या सर्वांच्या वैचारिक प्रवासाच्या 5 वर्षांचा दिवस आहे. देश आणि देशाला समर्पित केलेला वेळ पुन्हा एकदा मांडायचा आहे. 17 व्या लोकसभेने 5 वर्षांच्या देशसेवेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि अनेक आव्हानांचा सामना करूनही प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. G-20 शिखर परिषदेदरम्यान देशातील प्रत्येक राज्याने भारताची क्षमता आणि त्यांच्या राज्याचे गुण जगासमोर मांडले, ज्याचा प्रभाव आजही आहे. G-20 च्या माध्यमातून भारताची लोकशाही व्यवस्था आहे. संपूर्ण जगासमोर सादर केले ते पूर्ण करायचं असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं कौतुक
नरेंद्र मोदी यांनी नवी संसद भवन बांधण्याचा निर्णय घेतल्याचे श्रेय लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना दिले. तुम्ही नि:पक्षपातीपणे काम असं मोदी म्हणाले. कोरोना काळात सर्व खासदारांच्या निधीतून 30 टक्के कपात केली गेली याबाबत बोलताना मोदींनी सर्वांचे आभार मानले. संकटाच्या काळात देशाच्या गरजा लक्षात घेऊन जेव्हा मी खासदार निधी कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा सर्व खासदारांनी क्षणाचाही विलंब न लावता हा प्रस्ताव मान्य केल्याचे मोदींनी आवर्जून सांगितले.
पाच वर्षांत मानवजातीने सर्वात मोठं संकट बघितलं
दरम्यान, पाच वर्षांत मानवजातीने सर्वात मोठं संकट बघितलं. मात्र, या संकट काळात देशाचं काम थांबलं नाही. 17 लोकसभेमध्ये आमच्या सरकारने तृतीयपंथीयांना ओळख देण्याचं काम केलं. त्यासोबतच तीन तलाकबाबत महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. कलम 370 हटवण्यात आलं आणि काश्मिरी लोकांना सामाजिक न्याय देण्यात आला. या पाच वर्षांत अनेक ऐतिहासिक कायदे बनवल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
Web Title: Pm modi in his last speech in the 17th lok sabha thanked all mps elaborated on many topics read important points from speech nryb