संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- ट्विटर)
नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. महाराष्ट्रात महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळताना दिसून येत आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते आहे. दरम्यान आजपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, “आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण 16 विधेयक सादर करण्यात येणार आहेत. या हिवाळी अधिवेशनात सर्व खासदारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. काही लोक नवीन खासदारांचा आवाज दाबून टाकण्याचे काम करतात. मागच्या पिढीने लोकशाहीत नवीन पिढी तयार करायची असते. काही जण संसदेचे काम चालू नये यासाठी प्रयत्न करत असतात.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यमान सरकारला अधिक ताकद दिली आहे. संसदेत अनेक विषयांवर चर्चा करणे आवश्यक असते. सखोल विश्लेषण करणे आवश्यक असते. जगात भारताचे आकर्षण वाढले आहे. जग भारताकडे आशेने पाहत आहे. संसदेतून विश्वाला एक चांगला संदेश मिळाला पाहिजे.”
As the Winter Session of the Parliament commences, I hope it is productive and filled with constructive debates and discussions.https://t.co/X6pmcxocYi
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2024
दरम्यान आज सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. तासाभराच्या अधिवेशनामध्ये मोठा राडा झाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे मोठा गदारोळ झाला. यावरुन लोकसभेचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील एका मशीदीच्या मुदद्यांवरुन हा वाद सुरु झाला आहे. संभलमधील मशीदीचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी दोन गटामध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी ट्वीट केले. आणि हाच मुद्दा विरोधकांनी संसदेमध्ये उचलून धरला. यामुळे विरोधी व सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला. या हिंसाचार प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली.
काय आहे राहुल गांधींचे ट्वीट?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर या संभल मशीद सर्वेक्षण प्रकरणातील मृत्यूंवर भाष्य केले. राहुल गांधींनी लिहिले की, उत्तर प्रदेशातील संभल येथे नुकत्याच झालेल्या वादावर राज्य सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना.
पुढे लिहिले आहे की, सर्व संबंधितांचे न ऐकता प्रशासनाने केलेल्या असंवेदनशील आणि असंवेदनशील कृतीमुळे परिस्थिती आणखी बिघडली आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला – ज्याला भाजप सरकार थेट जबाबदार आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी भाजपचा सत्तेचा वापर राज्याच्या किंवा देशाच्या हिताचा नाही. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा. शांतता आणि परस्पर सौहार्द राखण्याचे माझे आवाहन आहे. जातीयवाद आणि द्वेष न करता भारत एकता आणि संविधानाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमधून केले आहे.