शर्मिष्ठा मुखर्जीने काँग्रेसवर केला शाब्दिक हल्ला (फोटो सौजन्य - Wikipedia)
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. ती म्हणाली, ‘काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त झाला आहे आणि आता पक्षाला त्याच्या दुःखद परिस्थितीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पक्षाची सध्याची परिस्थिती आणि आघाडीच्या नेत्यांमधील विचारसरणीचा अभाव यामुळे काँग्रेसचे अनेक जुने कार्यकर्ते यांना आज एकाकी वाटू लागले आहे’, अशी खंत शर्मिष्ठाने यावेळी व्यक्त केली आहे.
वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक का बोलावण्यात आली नाही आणि ठराव का मंजूर झाला नाही, असा प्रश्नही शर्मिष्ठा यांनी यावेळी उपस्थित केला असल्याचे दिसून आले आहे.
CWC बाबत विचारला प्रश्न
शर्मिष्ठा म्हणाली की तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर CWC बैठक बोलावली नाही तेव्हा तिला वाईट वाटले. CWC हे काँग्रेसचे सर्वात मोठे निर्णय घेणारे युनिट आहे. याचे उत्तर काँग्रेसला द्यावे लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हणत स्पष्ट सवाल यावेळी काँग्रेसला केला आहे. तर शर्मिष्ठाने पुढे म्हटले की, ‘मी तुम्हाला फक्त वस्तुस्थिती सांगू शकते पण मला फक्त इतकेत यामध्ये सांगायचे आहे की हे जाणूनबुजून होते की निष्काळजीपणा होता हे मला माहीत नाही. एवढ्या जुन्या पक्षात काय परंपरा आहेत? असाही प्रश्न त्यांनी यावेळी परखडपणे विचारला आहे.
काँग्रेसची परिस्थिती हालाखीची
शर्मिष्ठा म्हणाल्या, ‘जर संस्थात्मक स्मरणशक्तीचा हा विध्वंस झाला असेल, तर राहुल गांधी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना या आधीच्या परिस्थितीत काँग्रेसने कसे काम केले हे माहीत नसेल, तर ही काँग्रेसमध्येच एक गंभीर आणि दुःखद परिस्थिती आहे.’ काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील नेत्यांचे योगदान ओळखण्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘पीव्ही नरसिंह राव (माजी पंतप्रधान) यांच्यासह जे केले गेले ते आपण विसरू नये.’
‘वास्तविक काँग्रेसचा विनाश झालाय’
शर्मिष्ठाने यावेळी म्हटले की, ‘काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा, म्हणजे सोशल मीडिया, मला आणि माझ्या वडिलांना या मुद्द्यावर आणि इतर काही मुद्द्यांवर सतत लक्ष्य करत होते. माझ्या आणि माझ्या वडिलांसारख्या मोठ्या नेत्याच्या विरोधात ज्या प्रकारची भाषा वापरली जात आहे, त्यावरून काँग्रेसचा खऱ्या अर्थाने विनाश झाल्याचे दिसून येते.
शर्मिष्ठा म्हणाल्या, ‘सोशल मीडियावर ट्रोल होण्याऐवजी काँग्रेसने गांभीर्याने आत्मपरीक्षण करायला हवे, काँग्रेसच्या विचारसरणीवर कट्टर विश्वास असलेला माझ्यासारखे नेता आज पक्षापासून अलिप्त का वाटत आहे? याचा विचार व्हायला हवा’
मनमोहन सिंह स्मारकाबाबत काय म्हणाली शर्मिष्ठा?
याआधी, X वरच्या एका पोस्टमध्ये शर्मिष्ठा म्हणाली होती, ‘जेव्हा बाबांचे निधन झाले, तेव्हा काँग्रेसने शोक व्यक्त करण्यासाठी CWC बैठक बोलावण्याची तसदी घेतली नाही. एका ज्येष्ठ नेत्याने मला सांगितले की, हे राष्ट्रपतीसाठी केले जात नाही. हा पूर्ण मूर्खपणा आहे कारण नंतर मला बाबांच्या डायरीतून कळले की के.आर. नारायणन यांच्या निधनानंतर सीडब्ल्यूसीला बोलावण्यात आले आणि शोकसंदेश बाबांनीच तयार केला होता.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या स्मारकाच्या स्थापनेवरून निर्माण झालेल्या वादावर शर्मिष्ठा म्हणाल्या की, या वादात आपण पडणार नाही, कारण ती आता काँग्रेसचा भाग नाही आणि राजकारण सोडले आहे. तथापि, त्यांनी सिंह यांचे स्मारक बांधणे योग्य आहे असं म्हटलं आणि सांगितले की भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारदेखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना मरणोत्तर देण्यात यावा. त्या म्हणाल्या, ‘मला यावर काहीही बोलायला आवडणार नाही, मी आता काँग्रेसशी संबंधित नाही, मी राजकारण सोडले आहे. राहुल गांधी काय बोलले याचा काँग्रेसला खुलासा करण्याची गरज आहे.
स्मारकाची मागणी योग्य
मुखर्जीने यावेळी सांगितले की, ‘मला वाटते की मनमोहन सिंह यांचे स्मारक बांधण्याची मागणी पूर्णपणे न्याय्य आहे. ते भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते, ते भारताच्या विकासकथेचे जनक होते, ते दोनदा पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारण्याची मागणी पूर्णपणे रास्त आहे. तसेच, भारतातील सामान्य नागरिकांच्या वतीने मी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करतो, ते त्यास पूर्णपणे पात्र आहेत. सिंह यांचे २६ डिसेंबर रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.