Prime Minister Clarified His Position Against Corruption The Next Target Is Nrdm
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी स्पष्ट केली भूमिका; पुढचं टार्गेट ठरलं…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. मी खाणार नाही आणि कोणाला खाऊ देणार नाही, ज्यांच्याकडून भ्रष्टाचारांनी खाल्ले आहे त्यांना त्यांचे हक्क परत केले जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. मी खाणार नाही आणि कोणाला खाऊ देणार नाही, ज्यांच्याकडून भ्रष्टाचारांनी खाल्ले आहे त्यांना त्यांचे हक्क परत केले जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
दिल्लीतील दारू घोटाळा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरे दिली. दिल्लीच्या रद्द केलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई सुरू ठेवण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. मी खाणार नाही आणि कोणाला खऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी पुढील टार्गेटही सांगितले.
मोदी म्हणाले, मोदी सरकार सुरुवातीपासून ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ या तत्त्वावर काम करत आहे. आता भ्रष्टाचाराचे बळी ठरलेल्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Web Title: Prime minister clarified his position against corruption the next target is nrdm