नवी दिल्ली : आज देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचं औचित्य साधून देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यावेळी लाल किल्ल्यावरून त्यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी घराणेशाही आणि भ्रष्ट्राचार या मुद्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. देशाला भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन समस्यांनी ग्रासलंय, असं म्हणत त्यांनी मोदींनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधीत केलं. यावेळ त्यांनी अनेक मह्त्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांना डिवचलं. देशात अनेक गंभीर समस्या आहेत. पण त्यातील दोघांवर मी भाष्य करणार आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर (Narendra Modi on Opposition) अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. देशाला विकसीत करण्यासाठी भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन समस्यांना सगळ्यात आधी तोंड द्यावं लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचित केलं. दरम्यान, जोपर्यंत भ्रष्टाचाराप्रती घृणा आणि द्वेष प्रत्येक भारतीयाचा मनात निर्माण होत नाही, तो पर्यंत भ्रष्टाचाराची मानसिकता संपवणं कठीण आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भ्रष्टाचाराविषयी (Corruption in India) द्वेष निर्माण होण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.
[read_also content=”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लाला किल्ल्यावरून महिला शक्तीचा जागर! https://www.navarashtra.com/india/awakening-of-womens-power-from-red-fort-in-the-nectar-festival-of-freedom-nrps-316172.html”]
घराणेशाहीवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज व्यक्त केली. घराणेशाहीविरोधात मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की फक्त राजकीय विधानं करतो आहेत. पण तसं नसून घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना डिवचलंय. घराणेशाहीच्या राजकारणामुळे कुटुंबांना पोसलं जात असल्याचं दुर्भाग्यपूर्ण चित्र भारत अनुभवतोय आणि त्याचा फटका भारताला बसतोय, असंही ते म्हणाले.
[read_also content=”देशभरात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा https://www.navarashtra.com/india/prime-minister-modi-wishesh-happy-independence-day-to-citizens-nrps-316168.html”]