भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (Prophet Remark Row) केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. निदर्शने आणि हिंसाचाराचे लोण झारखंडपर्यंत पोहोचले आहे. झारखंडमध्ये (Jharkhand Protest) शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.
#WATCH | Jharkhand: Protest over the controversial remarks by suspended BJP leader Nupur Sharma turned violent in Ranchi. Vehicles were torched and vandalised and stone-pelting occurred. Injuries reported. pic.twitter.com/Z5FIndjZzf
— ANI (@ANI) June 10, 2022
झारखंडमधील ( Jharkhand) रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी रस्त्यावर हजारो लोक जमले होते. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली. पोलिसांनी लाठीमार तसेच गोळीबार केला. निदर्शनाला हिंसक वळण मिळाले. निदर्शकांनीदेखील पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मुद्दसीर उर्फ कैफी आणि मोहम्मद साहील अशी मृतांची नावे आहेत. तसेच आठ जणांवर सध्या उपचार सुरु आहे.
[read_also content=”केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यामध्ये झाली ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ https://www.navarashtra.com/india/hike-in-da-of-central-government-employees-nrsr-291126/”]
रांची शहरात नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. सध्या या जमावावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या रांची शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.