आज तामिळनाडूमध्ये १४ लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व त्यांचे सहकारी कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य हेलिकॉप्टरमध्ये होते. सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच निलगिरीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले.
धक्कादायकबाब म्हणजे या हेलिकॉप्टरमधून पंतप्रधानांपासून ते सैन्यप्रमुखांपर्यंत अनेक VVIP व्यक्तींना हे हेलिकॉप्टर सेवा देतं. सोबतच अनेक महत्वाच्या ऑपरेशनमध्ये देखील या हेलिकॉप्टरने महत्वाची भुमीका बजावली आहे. पण याच हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याने आता त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं रहातं.
Mi-17V-5 हे दुहेरी इंजिन असलेले बहुउद्देशीय रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे. हे रशियन कंपनी मिल मॉस्को हेलिकॉप्टर प्लांट, कझान हेलिकॉप्टर प्लांट आणि उलान-उडे एव्हिएशन प्लांट यांनी तयार केले आहे. Mi-17V-5 हेलिकॉप्टर हे Mi-8 हेलिकॉप्टरची अपग्रेडेड आवृत्ती आहे.
Mi-17V-5 ही Mi-8 ची उच्च उंची आणि अत्यंत प्रतिकूल हवामानातही चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. Mi-17V-5 विशेषत: उंचीवर आणि उष्ण हवामानात चांगल्या प्रकारे ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
Mi-17V-5 हे जगातील सर्वात अपग्रेड हेलिकॉप्टर आहे. हे सैन्यची शस्त्रं वाहतूक, फायर सपोर्ट, गार्ड पेट्रोल आणि शोध आणि बचाव (SAR) मोहिमांमध्ये देखील तैनात केले जाऊ शकते. तसेच Mi-17V-5 हे कार्गो वाहतुकीसाठी डिझाइन केले आहे. याचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासापासून म्हणजे व्हीआयपीपासून ते लष्कराच्या ऑपरेशनपर्यंत केला जातो.
पण, आता याच हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याने त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं रहातंय.