लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते. याशिवाय डाळिंबामध्ये असलेल्या फायबरमुळे वाढलेले वजन कमी होते. पण काहींच्या आरोग्यासाठी डाळिंब अतिशय हानिकारक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी आहारात डाळिंबाचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
'या' लोकांनी चुकूनही करू नका डाळिंबाचे सेवन, आरोग्यासंबंधित वाढू शकतात गंभीर समस्या
डाळिंब खाल्यामुळे काहींच्या शरीरावर ऍलर्जी होण्याची जास्त शक्यता असते. खाज येणे, पुरळ उठणे किंवा त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे स्किन ऍलर्जी असलेल्या लोकांनी डाळिंबाचे दाणे खाऊ नये.
कमी रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी डाळिंबाचे सेवन अजिबात सेवन करू नये. डाळिंबाच्या थंड प्रभावामुळे शरीरातील रक्ताभिसरण मंदावते आणि रक्तदाब आणखीनच कमी होतो.
डाळिंब खाल्ल्यानंतर पोटासंबंधित समस्या उद्भवत असतील तर डाळिंबाचे अजिबात सेवन करु नये. यामुळे शरीरातील पाणी आणखीनच कमी होऊन जाते. डाळिंबाच्या दाण्यांमधील थंडाव्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही.
विषाणूजन्य किंवा खोकल्याची समस्या वारंवार उद्भवत असेल तर डाळिंब अजिबात खाऊ नये. यामुळे घशात खवखव वाढण्याची शक्यता असते. तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
कोणत्याही मानसिक आजाराची औषध घेत असाल तर डाळिंब खाऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डाळिंबाचे सेवन करावे. डाळिंब खाल्ल्यामुळे मेंदूच्या नसा थंड होऊ शकतात.