फोटो सौजन्य - सोशल मिडिया
मागिल काही महिन्यामध्ये भारताच्या अनेक क्रिकेट खेळाडूंनी निवृती घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा यांनी सोशल मिडियावर निवृतीची घोषणा केली आहे. आर अश्विनने बाॅर्डर गावस्कर ट्राॅफी मालिकेमध्ये अचानक निवृती घेतली होती त्यानंतर त्याने आता काही दिवसांपुर्वी त्याने आयपीएलमधून देखील निवृतीची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामधील मालिकेसंदर्भात त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडीओ शेअर केले होते.
टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही अलीकडेच आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. गेल्या हंगामात अश्विन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता, जो फारसा खास नव्हता. त्याचे आयपीएल 2025 मध्ये सीएसकेच्या संघामध्ये पुनरागमन झाले होते पण त्याने या सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर अश्विनने वाढत्या वयाचा विचार करून आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, अश्विनने इतर परदेशी लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आयपीएलनंतर अश्विनने आता यूएई लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आयएलटी-२० चा पुढील हंगाम २ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान यूएईमध्ये खेळला जाईल. आर अश्विनने या लीगच्या लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आर अश्विन म्हणाले की मी आयोजकांच्या संपर्कात आहे. मला आशा आहे की लिलावासाठी नोंदणी केल्यानंतर मला काही खरेदीदार मिळेल.
ILT-20 च्या नवीन हंगामासाठीचा लिलाव 30 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. तर नोंदणी 10 सप्टेंबर रोजी पूर्ण होईल. तुम्हाला सांगतो की, ILT-20 चा लिलाव पहिल्यांदाच होणार आहे. यापूर्वी या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड ड्राफ्ट सिस्टम अंतर्गत करण्यात आली होती. अशा परिस्थितीत, यावेळी आर अश्विन या लीगमध्ये खेळताना दिसू शकतो. ज्यामुळे त्याला करोडो रुपये मिळू शकतात.
🚨R Ashwin confirms his interest to participate in the upcoming edition of the ILT20
“Yes, I am in talks with the organisers. Hopefully, I will have a buyer if I register for the auction” Ashwin told Cricbuzz pic.twitter.com/CRleVhUVex
— Cricbuzz (@cricbuzz) August 31, 2025
त्याच्या आयपीएल कारकिर्दीत, आर अश्विनने ५ फ्रँचायझींसाठी सामने खेळले, ज्यात चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांचा समावेश होता. या काळात अश्विनने २२१ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी करताना १८७ विकेट्स घेतल्या.