Watch : हेलिकॉप्टर हवेतून थेट नदीत कोसळले! अपघाताचा थरारक VIDEO सोशल मीडियावर VIRAL ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
helicopter crashes into river : मलेशियाच्या जोहोर प्रांतात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. पोलिस दलाचे एक हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंग करताना थेट नदीत कोसळले असून, या अपघाताचा थरारक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या दृश्यांनी प्रेक्षकांचे मन सुन्न झाले आहे, कारण व्हिडिओत असे स्पष्टपणे दिसते की, जणू काही नदीच त्या हेलिकॉप्टरला स्वतःकडे खेचून घेत आहे!
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचे हे हेलिकॉप्टर नियमित लष्करी सरावात सहभागी झाले होते. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे नियंत्रण ढासळले. परिणामी, हेलिकॉप्टर थेट सुंगाई पुलाई या नदीत जाऊन कोसळले. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, हेलिकॉप्टर हवेत स्थिर असताना अचानक एका बाजूने झुकते आणि जोरात खाली येऊन थेट पाण्यात कोसळते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य
या भयावह अपघातात सुदैवाची बाब म्हणजे हेलिकॉप्टरमधील सर्व पाच पोलिस चमत्कारिकरित्या बचावले आहेत. अपघात घडल्यानंतर अवघ्या काही क्षणांत मलेशियन मरीन पोलिस फोर्स आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जलद बचाव कारवाई करत सर्वांना बाहेर काढले. नंतर सर्व पोलिसांना मलेशियन मेरीटाईम एन्फोर्समेंट एजन्सीच्या जेटीवर आणण्यात आले आणि पुढे सुलताना अमिनाह रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून, केवळ किरकोळ जखमा झाल्या आहेत.
WATCH: Police helicopter crashes into Pulai River in Johor, Malaysia, at least 5 people hospitalized. pic.twitter.com/3456sNg5xT
— AZ Intel (@AZ_Intel_) July 10, 2025
credit : social media
सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. पाण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याच्या क्षणी निर्माण झालेला प्रचंड गोंधळ, बचाव बोटांची धावपळ आणि मदतीसाठी धावलेली आपत्कालीन पथके हे सर्व दृश्य अत्यंत अंगावर शहारे आणणारे आहेत. अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना “हे दृश्य पाहून हृदय थरथरले” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता NASA वरही ट्रम्प सावट! 2000 लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, वैज्ञानिक प्रकल्पांवर संकट
हा अपघात फक्त मलेशियापुरताच मर्यादित राहिला नाही. जगभरातील लोकांनी व्हिडिओ पाहून चिंता व्यक्त केली आहे. काहींनी यामागे तांत्रिक त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काहींनी पायलटच्या धैर्याचे कौतुक केले आहे. ही घटना एक मोठा इशारा आहे की, आधुनिक तंत्रज्ञान असले तरी सुरक्षा यंत्रणेत सुधारणा आवश्यक आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी तत्काळ चौकशी आणि उपाययोजना होणे गरजेचे आहे.