निवडणूक आयोग राहुल गांधीच्या जाळ्यात ?
Raul Gandhi on Election Commission Of India: देशभरातील विरोधी पक्षनेत्यांकडून सातत्याने लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यात झालेल्या विषेशत: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत आणि निकालांत फेरफार झाल्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदारांची नोंदणी, बनावट मतदान, टार्गेट बूथ रिगिंग आणि CCTV फुटेज वा पुरावे लपवण्याचे प्रकार उघड केले आहेत. महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक ७.८३ टक्क्यांनी वाढलेली मतदान टक्केवारी ही निवडणूक इतिहासातील अभूतपूर्व घटना आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते..
हे सर्व सुरू असतानाच काल निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ एका वर्षाऐवजी केवळ ४५ दिवसांतच नष्ट कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयावर खासदार राहुल गांधी य़ांनी पुन्हा निशाणा साधत संशय व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ एका वर्षाऐवजी केवळ ४५ दिवसांत डिलीट करण्याचा घेतलेला निर्णय हाही संशयास्पद आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे लोकशाहीसाठी धोकादायक ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. मतदार यादी?- Machine Relatable स्वरूप प्रदान करणार नाही, सीसीटीव्ही फुटेज?-कायदा बदलून ते लपवण्यात आले. निवडणुकीचा फोटो-व्हिडिओ?- आता, एका वर्षात नाही, तर आपण ते फक्त ४५ दिवसांत नष्ट केले जाणार. ज्याच्याकडून उत्तर हवे होते – तेच पुरावे नष्ट करत आहेत. त्यामुळे हे स्पष्ट दिसून आले आहे आणि फिक्स निवडणूक लोकशाहीसाठी विषासारख्या आहेत.
दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात पानभर लिहिलेल्या लेखात पाच टप्प्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड, बनावट मतदार, बोगस मतदान, टार्गेट बुथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लवपल्याचे आरोप निवडणूक आयोगावर केले होते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक ७.८३ टक्के मतदान टक्केवारी वाढण्याच्या मुद्याकडेही लक्ष वेधलं होत. ही आतापर्यंतच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते. त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच-फिक्सिंग असल्याच आरोपपही केला होता. या आरोपांनंतर आता निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज ४५ दिवसात डिलीट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहे, ही निवडणूक फिक्स केल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने (EC) निवडणुकीसंदर्भातील व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रे जतन करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित डेटा केवळ ४५ दिवसांपर्यंत जतन केला जाणार असून, त्या कालावधीत कोणतीही निवडणूक याचिका दाखल न झाल्यास तो डेटा नष्ट केला जाईल.
३० मे रोजी आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEO) पत्र पाठवून ही सुधारित धोरणं स्पष्ट केली. आयोगाच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी ही कायद्याने अनिवार्य नसून ती निवडणूक प्रक्रियेसाठी आंतरिक व्यवस्थापनाचे साधन म्हणून वापरली जाते. अलीकडच्या काळात अशा दृश्यांचा सोशल मीडियावर गैरवापर वाढला असून, त्यातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे म्हटले आहे.