अभिनेत्री जयाप्रदा यांच्या नर्सिंग कॉलेजवर छापा; मुंबई, दिल्लीतही झाडाझडती, अटकेसाठी तयारीला आलाय वेग…

आचारसंहिता उल्लंघनाच्या दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्या अटकेसाठी कारवाईला वेग दिला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथकाने जयाप्रदा (Jaya Prada) यांच्या शहजादनगरमधील नीलवेणी कृष्णा स्कूल ऑफ नर्सिंगवर छापा टाकला.

    नवी दिल्ली : आचारसंहिता उल्लंघनाच्या दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्या अटकेसाठी कारवाईला वेग दिला आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथकाने जयाप्रदा (Jaya Prada) यांच्या शहजादनगरमधील नीलवेणी कृष्णा स्कूल ऑफ नर्सिंगवर छापा टाकला. त्या तेथे न आढळल्याने पथकाने आता दिल्ली आणि मुंबईत त्यांचा शोध सुरू केला आहे.

    भाजपच्या तिकिटावर रामपूरमधून निवडणूक लढवली होती. त्याच्यावर स्वार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यामध्ये आचारसंहिता असतानाही 19 एप्रिल रोजी नूरपूर गावात एका रस्त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दुसरे प्रकरण केमरी पोलिस ठाण्यातील असून त्यात पिपलिया मिश्रा गावात आयोजित एका जाहीरसभेत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात (मॅजिस्ट्रेट ट्रायल) सुरू आहे. या प्रकरणांमध्ये चार वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

    दोन खटले प्रलंबित

    जयाप्रदा यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचे दोन खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. दोन्ही प्रकरणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहेत.