हिंदू धर्मात अग्निदेवाला देव आणि मानव यांच्यामधील दूत मानलं जातं. यज्ञ किंवा हवनात दिलेली आहुती अग्निदेव देवतांपर्यंत पोहोचवतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आहुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू पवित्र आणि सात्त्विक असाव्यात, याला विशेष महत्त्व दिलं जातं. चंदन आणि आंब्याची लाकडं याच कारणामुळे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानली जातात.
धार्मिक ग्रंथांनुसार चंदन हे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना प्रिय आहे. चंदनाचा सुगंध मन आणि वातावरण शुद्ध करतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे यज्ञात चंदनाची आहुती दिल्यास देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं सांगितलं जातं. अनेक पुराणांमध्ये चंदनाला सात्त्विकता, शांती आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं गेलं आहे.
Vastu Tips: फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास वाढू शकतात अडचणी, काय सांगते वास्तुशास्त्र
आंब्याच्या झाडालाही हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. आंब्याची पानं शुभकार्यांमध्ये तोरण म्हणून लावली जातात. धार्मिक मान्यतेनुसार आंब्याच्या वृक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि तो समृद्धीचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच यज्ञात आंब्याच्या समिधा म्हणजे लाकूड वापरणं शुभ मानलं जातं. वेदांमध्ये आंब्याच्या लाकडातून निर्माण होणारा अग्नी पवित्र आणि देवतांना प्रिय असल्याचा उल्लेख आढळतो.
काही दंतकथांमध्ये असंही सांगितलं जातं की, ऋषी-मुनी यज्ञ करताना मुख्यतः आंबा, पिंपळ, पलाश आणि चंदनाच्या समिधांचा वापर करत असत. या वृक्षांमध्ये दैवी ऊर्जा असल्याची श्रद्धा होती. त्यामुळे या लाकडांच्या आहुतीमुळे यज्ञ अधिक फलदायी होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं.
याच परंपरांमुळे आजही हवन-यज्ञामध्ये चंदन आणि आंब्याच्या लाकडांना विशेष महत्त्व दिलं जातं.
चंदनाची लाकडं शुभ का मानली जातात?
याची शास्त्रीय कारणं अशी की, काही संशोधनांनुसार हवनात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट लाकडांमुळे वातावरणातील काही जंतू आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. चंदनाचा सुगंध मानसिक शांतता देतो, तर आंब्याच्या लाकडामुळे निर्माण होणारी उष्णता जीवजंतूंना मारते . यामुळेच अग्निदेवतेला आहुती देताना चंदन आणि आंब्याची लाकडं शुभ, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जातात.
Vastu Tips: घरात चिंचेचे रोप लावणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र






