शैक्षणिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात ऐतिहासिक कामगिरी केली.भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या 2024 – 25 च्या शैक्षणिक परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेचं शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.’मिशन उत्कर्ष’ उपक्रमांतर्गत तत्कालीन सीईओ एस कार्तिकेयन आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे च्या नेतृत्वात 72 निर्देशकांवर सखोल काम करून शिक्षण विभागाल 77 टक्के गुण मिळाले आहे. यामध्ये युडायस प्लस डेटा प्रमाणिकरण, भौतिक सुविधा, दिव्यांग विद्यार्थी माहिती यावर काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. 2018 पासून सलग आठ वेळा प्रथम क्रमांकावर असणाऱ्या पंजाबमधील बरनाळा जिल्ह्याला कोल्हापूरने मागे टाकत देशात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम क्रमांकांचा मानकरी ठरला आहे.त्यामुळे आज जिल्हा परिषदेत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.