आज संध्याकाळी देशाच्या इतिहासात एक नवा बदल होणार आहे. कारण सर्व देशवासियांना परिचित असलेला राजपथ (Rajpath) हे नाव आता इतिहासात नोंदल जाणार आहे. राजपथाची नवी ओळख आता कर्तव्यपथ (Kartvya Path) या नावाने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या हस्ते आज सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतगर्त विजय चौक ते सी-हेक्सागॉनपर्यंतच्या नव्या कर्तव्यपथ या परिसराचं उद्घाटन होणार आहे.
आज गुरुवार, (8 सप्टेंबर) सायंकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोंदी ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन करतील. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला ‘कर्तव्यपथ’ असं ओळखण्यात येईल.
[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/yellow-alert-for-rain-in-konkan-west-maharashtra-marathwada-and-vidarbha-nrps-323451.html आजही बरसणार; कोकण,पश्चिम महारष्ट्र, मराठवाड्याहल विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट”]
नवीन संसद भवना बरोबरच राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटकडे जाणाऱ्या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 4,087 झाडे लावण्यात आली आहेत. त्यावर 114 आधुनिक बोर्ड आहेत. 900 हून अधिक दिवे बसवले आहेत. 8 फीचर ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्याचे क्षेत्रफळ 1,10,457 चौरस मीटर आहे. काँक्रीटचे 987 जाडीचे खांब आहेत. याशिवाय त्यात 1490 मॅनहोल करण्यात आले आहेत. 4 पादचारी अंडरपास करण्यात आले आहेत. लाल ग्रॅनाइटचे 422 बेंच आहेत.