संग्रहित फोटो
या बैठकीत ‘संघटन सृजन अभियान’ या विषयावर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय वॅार रूमचे प्रमुख शशिकांत सेंथिल मार्गदर्शन करणार आहेत तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हे ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर हे ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्याशिवाय इतरांना प्रवेश नाही, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांनी दिली आहे.
हे सुद्धा वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल
काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला – सपकाळ
नुकतचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ते म्राहणाले, ज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीत मात्र अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो. वंचित बहुजन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी व रासप हे नवे मित्रपक्ष काँग्रेस पक्षाने जोडले. या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेस ठरला आहे. २०२९ ला अद्याप वेळ आहे, त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असेही सपकाळ म्हणाले.






