लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण (फोटो- ani)
लडाखला पूर्ण राज्याचा दर्ज देण्याची मागणी
सोनम वांगचूक 15 दिवसांपासून करतायत उपोषण
लेहमध्ये पेटवले भाजपचे ऑफिस
BJP Office in Leh: केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला संपरून राज्याचा दर्जा द्यावा यासाठी या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले. पर्यावरणवादी सोनम वांगचूक हे गेल्या 15 दिवसांपासून उपोषण करत आहेत. आंदोलकांनी भाजप कार्यालयचे पेटवून दिले आहे. नेमके काय घडले ते आपण जाणून घेऊयात.
पर्यावरणवादी सोनम वांगचूक हे गेल्या 15 दिवसांपासून उपोषण करत आहेट. लडाख हा केंद्रशासित प्रदेश असून, त्याला संपूर्ण राज्याचा दर्ज द्यावा अशी मागणी त्यांची आहे. तसेच संविधानाच्या सहाव्या अनूसूचीमध्ये समावेश करण्याची ते मागणी करत आहेत. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान यावेळेस विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली आहे. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. सीआरपीएफचे वाहन देखील यावेळी पेटवून देण्यात आले. आंदोलक भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. आंदोलकांनी भाजपचे ऑफिस देखील पेटवून दिल्याचे म्हटले जात आहे.
आज लडाख बंदची हाक देण्यात आली आहे. तीळ समर्थन देत हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलकांनी अनेक वाहने पेटवून दिल्याचे समजते आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. लडाखमध्ये लोकसभेच्या दोन जागा दिल्या जाव्यात, लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा, येथील जमातींना आदिवासी दर्जा मिळाव्या आशा प्रमुख मागण्या आंदोलकांच्या आहेत.
2019 मध्ये केंद्र सरकारने कलम 370 काढून टाकले. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन भाग झाले. जम्मू आणि काश्मीर हे तेव्हा दोन वेगळे केंद्र शासित प्रदेश बनले. तर लेह हा एक केंद्रशासित प्रदेश बनला. दरम्यान आता लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी सोनम वांगचूक यांच्याकडून केली जात आहे.
लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती
केंद्रातील मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये मागील वर्षी पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. आपल्या X हँडलवरून माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीनुसार, गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.