मागील काही दिवसांपासून पतंजली आयुर्वेदचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव (Yoga guru Baba Ramdev) हे चर्चेचा विषय बनले आहेत. कोरोना काळात केलेल्या खोट्या जाहिरातींमुळे रामदेव बाबा अडचणीत आले आहेत. कोरोना बरे करणारी औषध आपल्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात वैद्यकीय संस्थेने कोर्टात धाव घेतली. तसेच ते आता जनतेची माफी मागण्यासाठी देखील तयार झाले आहेत.पतंजलीकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये रामदेव बाबा यांच्या वकिलांनी हा प्रस्ताव ठेवल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आता रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाकडून १ आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिलला पार पडणार आहे.
रामदेव बाबा जनतेची माफी मागणार
रामदेव बाबा यांची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी म्हणाले, रामदेव बाबा जनतेची माफी मागण्यास तयार झाले आहेत. आम्हाला खेद व्यक्त करायची आहे. कारण जे काही झालं ते चुकीचं होत. सगळीकडे दाखवण्यात आलेल्या जाहिराती उत्साहात दाखवण्यात आल्या. आम्ही तस करायला नको होत. यापुढे आम्ही तसं करणार नाही. आम्ही आमच्या कृत्याचे समर्थन करत नाही. आम्ही माफी मागतोय, असे रामदेव बाबा यांचे वकील मुकूल रोहतगी त्यांची बाजू मांडताना म्हणाले.
आचार्य बाळकृष्ण म्हणाले, कायदेशीर दृष्टीने आम्ही तसं करायला नको होतं.सुप्रीम कोर्टात हिम कोहली यांनी रामदेव बाबांना विचारले, तुम्ही जे केलं आहे. ते कोर्टाच्या विरोधात केलं आहे. हे योग्य होतं का? असा सवाल विचारल्यानंतर रामदेव बाबा म्हणाले, यमूर्ती साहेब, मी इतकंच सांगेन की आमच्याकडून चूक झाली आहे. यासाठी मी जनतेची बिनाशर्त माफी मागतो. त्यावर पुन्हा हिमा कोहली म्हणाल्या, तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्यात तुम्ही एलोपॅथीबाबत प्रश्न उपस्थित केले. आपल्या देशात अनेक पद्धतीचा वापर केला जातो. त्यातील एक आयुर्वेद आहे.तुमचा जुना इतिहास चांगला नाही. तुम्ही वारंवार कोर्टाची अवहेलना केली आहे, असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.