नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि आता दरवर्षीप्रमाणे यंदाही देश प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. यंदा कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडची जोरदार तयारी सुरू असून या कडाक्याच्या थंडीतही रिहर्सल सुरू आहेत. हे वर्ष देखील खास आहे कारण यावेळी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. दरवेळेप्रमाणे कर्तव्य मार्गावर परेड काढण्यात येणार आहे. जर तुम्हीही ही परेड पाहायला जाण्याची प्लॅनिंग करत असणार तर सर्वात आधी तुम्हाला तिकीटांबद्दल माहिती हवी. जर तुम्हाला ही परेड पाहायची असेल, तर तुम्ही येथे ऑनलाइन तिकीट बुक करू शकता आणि तेही घरी बसून. तर मग आपण आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तिकिटे कशाप्रकारे बुक करता येईल हे जाणून घ्या.
[read_also content=”पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग, वेळेत फुड डिलिव्हरी करण्यासाठी Zomato बॅाय दुचाकी सोडून निघाला घोड्यावर; व्हिडिओ व्हायरल! https://www.navarashtra.com/india/zomato-dilivery-boy-delivered-food-by-horse-ride-in-hyderabad-amid-truck-drivers-agitation-nrps-494590.html”]
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तिकीट काढायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट aamantran.mod.gov.in वर जावे लागेल.
येथे जाऊन, सर्वप्रथम तुम्हाला ‘Book your ticket here’ वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला ‘Register to Book Ticket’ वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमचे पूर्ण नाव भराव लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी भरावा लागेल.
यानंतर तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका आणि ‘Request OTP’ वर क्लिक करा आणि मग रजिस्टर वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल आणि त्यानंतर पुढील प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी परेडचे तिकीट बुक करू शकता.
येथून तुम्ही पाहुण्यांसाठी परेडची तिकिटे आणि ऑनलाइन पास देखील खरेदी करू शकता.
व्हीव्हीआयपी जागांच्या मागे असलेल्या सीटची किंमत ५०० रुपये आहे.
दुसऱ्या तिकिटाची किंमत 100 रुपये आणि तिसऱ्या तिकिटाची किंमत 20 रुपये आहे.
परेडचे तिकीट काढण्यासाठी सरकारी ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे.