Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंधन तुटवड्याच्या अफवा आणि इराण युद्धाचे सावट; पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, ‘या’ मॉडेलवर भर

इराण युद्धाच्या सावटाखाली पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतली महत्त्वाची बैठक. इंधन तुटवड्याच्या अफवा रोखण्यासाठी 'टीम इंडिया' मॉडेलवर भर आणि देशातील पेट्रोल-डिझेल साठ्याचा आढावा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 07:54 PM
पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, 'या' मॉडेलवर भर (Photo Credit- X)

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, 'या' मॉडेलवर भर (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • इंधन तुटवड्याच्या अफवा आणि इराण युद्धाचे सावट
  • पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
  • ‘या’ मॉडेलवर भर
PM Modi Meeting CM Fuel Crisis: पश्चिम आशियातील इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली जागतिक परिस्थिती आणि देशातील इंधन पुरवठ्यावर होणारा त्याचा परिणाम, यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ‘व्हर्च्युअल’ बैठक घेतली. इंधन टंचाईच्या अफवा रोखणे आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत पाच राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले नाहीत. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये आगामी निवडणुकांचे वारे वाहत असल्याने, येथील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला हजेरी लावली नाही. इतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी इंधन सुरक्षेबाबत सविस्तर आढावा घेतला.

इंधन टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये घबराट

पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या आहेत. या अफवांमुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काही नागरिक भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन मोठ्या टाक्यांमध्ये डिझेल भरून साठवणूक करत आहेत. यामुळे गरजू ग्राहकांना इंधन मिळणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, देशात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही आणि साठा पुरेसा आहे.

PM Narendra Modi is chairing the meeting with CMs through video conferencing on the West Asia conflict to review preparedness and plans of states. pic.twitter.com/pqJS3iCgro — ANI (@ANI) March 27, 2026

Lockdown India: देशात पुन्हा लॉकडाऊन? सोशल मीडियावरील अफवांवर केंद्र सरकारचा मोठा खुलासा

‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ आणि पुरवठ्यातील आव्हाने

भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा कच्च्या तेलाच्या स्वरूपात पश्चिम आशियाई देशांतून आयात करतो. एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) साठीही आपण याच देशांवर अवलंबून आहोत. कच्च्या तेलाचे टँकर प्रामुख्याने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ (Strait of Hormuz) मधून येतात. युद्धामुळे या मार्गावर टँकर्सच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, इराणने भारताकडे येणाऱ्या टँकर्सना या मार्गावरून जाण्यासाठी विशेष सवलत दिली आहे, ज्यामुळे पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला नाही.

कोरोनाकाळातील ‘टीम इंडिया’ मॉडेलची पुनरावृत्ती

पंतप्रधान मोदींनी या संकटाचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा ‘टीम इंडिया’ मॉडेलचा मंत्र दिला आहे. कोरोना महासाथीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्या प्रकारे एकत्रितपणे काम केले होते, तशीच रणनीती आताही वापरली जाणार आहे. राज्यांना आवश्यक त्या प्रमाणात इंधन आणि गॅसचा पुरवठा सुनिश्चित करणे. मिळालेल्या इंधनाचे जनतेमध्ये सुयोग्य वितरण करणे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर वचक बसवणे. कोरोना काळात औषधे आणि मास्कवर भर होता, आता इंधन आणि एलपीजीच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रित केले जात आहे  “इराण युद्धाने निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला कोरोनाकाळाप्रमाणेच संघटित होऊन काम करावे लागेल,” असे आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केले.

India Fuel Supply News: देशात इंधनाचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका! पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Web Title: Shadow of iran war pm modi holds key meeting with chief ministers emphasis placed on this model

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • LPG Gas Crisis
  • Nation News
  • Petrol and diesel
  • PM Narendra Modi
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
1

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
2

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ
4

RAF Fairford : इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटनची थेट उडी? ‘या’ 5 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर जागतिक वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.