Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Politics: कर्नाटकात सत्ताबदलाचे वारे; सिद्धारामय्या देणार राजीनामा, कोण होणार नवा मुख्यमंत्री?

Karnataka Politics: कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चां दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी ब्रेकफास्ट मीटिंग घेणार असल्याची माहिती आहे. यामुळे राज्यातील राजकीय बदलांच्या चर्चांना आणखी जोर आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 27, 2026 | 05:28 PM
कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी; सिद्धरामय्या आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी; सिद्धरामय्या आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार असल्याच्या चर्चा
  • उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी ब्रेकफास्ट मीटिंग घेणार
  • काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिल्याची माहिती
Siddaramaiah resignation rumors News:  कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर सिद्धारामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डी.के. शिवकुमार ( D.K.Shivakumar) कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील, अशीही माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री बदलाच्या या चर्चांदरम्यान कर्नाटकाच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यास राज्यात चार उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा फॉर्म्युला चर्चेत आहे.

उपमुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार कोण आहेत?

काँग्रेसच्या सुंत्रांनुसार, दलित कोट्यातून कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे , ओबीसी कोट्यातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या, लिंगायत कोट्यातून एम. बी. पाटील आणि ईश्वर खंड्रे, आणि अल्पसंख्याक कोट्यातून के. जे. जॉर्ज, यू. टी. खादर आणि जमीर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Pinarayi Vijayan: केरळमध्ये मोठा राडा! माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या घरावर ईडीची छापेमारी; संतापलेल्या समर्थकांचा ED टीमवर दगडफेक

ब्रेकफास्ट मीटिंगमुळे चर्चेत आणखी भर

कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चां दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी ब्रेकफास्ट मीटिंग घेणार असल्याची माहिती आहे. यामुळे राज्यातील राजकीय बदलांच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. ही बैठक गुरुवारी (२८ मे) बंगळूरमधील मुख्यमंत्र्यांच्या ‘कावेरी’ या शासकीय निवासस्थानी होणार आहे. बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नेतृत्वबदलाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देऊ शकतात.

डिसेंबर २०२५ मध्ये, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात बहुचर्चित ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ बैठक झाली होती. ही बैठक शिवकुमार यांच्या निवासस्थानी झाली होती. त्यावेळी, मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपाबाबतच्या चर्चांदरम्यान काँग्रेस नेतृत्वाने एकतेचा संदेश दिला होता.

Mohan Bhagwat Lucknow Visit: मोहन भागवतांचा लखनौ दौऱ्यावर; UP मध्ये सत्तेच्या हॅट्ट्रिकसाठी भाजपचे ‘Triple S’ मॉडेल

डी. के. शिवकुमार यांना हे पद मिळणार का?

काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सिद्धारामय्या यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या सुचना दिल्याचे सांगितले जात आहे. सिद्धारामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर डी. के शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतील, असेही वृत्त आहे. काँग्रेस नेतृत्वाने सिद्धरामय्या यांना केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. तर पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाणार असल्याहीची चर्चा आहे. याशिवाय यंतीद्र सिद्धारामय्या यांना काही महत्त्वाच्या खात्यांचे आश्वासनही देण्यात आले आहे.

राजीनामा देण्यापूर्वी सिद्धरामय्या मंत्री आणि आमदारांसोबत स्नेहभोजन बैठक घेऊ शकतात. गुरुवारी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवकुमार यांच्या समर्थकांनी ते पुढील मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पोस्टर लावण्यास आणि सोशल मीडियावर संदेश शेअर करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने अद्याप नेतृत्व बदलाबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

 

 

Web Title: Siddaramaiah resignation rumors congress d k shivakumar next karnataka cm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • dk shivkumar
  • Karnataka Chief Minister Siddaramaiah
  • Karnataka Politics
  • National Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.