Mohan Bhagwat Lucknow Visit: मोहन भागवतांचा लखनौ दौऱ्यावर; UP मध्ये सत्तेच्या हॅट्ट्रिकसाठी भाजपचे 'Triple S' मॉडेल
Mohan Bhagwat Lucknow Visit: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापू लागले आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. लखनौ येथे तीन दिवसीय दौऱ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत संघ आणि भाजप नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या.
आरएसएस कडून हा दौरा नियमित संघटनात्मक कार्यक्रम आणि शताब्दी वर्षचा आढावा असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय विश्लेषक या दौऱ्याकडे आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने पाहत आहेत.
संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील संघटनात्मक स्थितीचा आढावा
उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत असून त्यासाठी संघ आणि भाजपमधील समन्वय अधिक मजबूत कऱण्यावर भर दिला जात असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आरएसएस आणि भाजपच्या ‘ट्रिपल S’ मॉडेल चर्चेत आले आहे.
या मॉडेलनुसार संघ, संघटना आणि सरकार यांच्यात प्रभावी समन्वय साधण्याची रणनीती आखली जात आहे.आरएसएस वैचारिक बळ आणि कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्यावर भर देत आहे. भाजप निवडणूक आणि बूथ स्तरीय संघटन मजबूत करणार आहे. तर सरकार योजनांच्या माध्यमातून जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम करणार
भाजपकडून उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी संघ आणि भाजपमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर ‘ट्रिपल एस मॉडेल’ चर्चेत आले आहे.
या मॉडेलनुसार ‘संघ, संघटना आणि सरकार’ यांच्यात प्रभावी समन्वय साधण्याची रणनीती आखली जात आहे. येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेशात आरएसएस एक वैचारिक बळ आणि कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणार असल्याची माहिती आहे. तर भाजपकडून निवडणूक व्यवस्थापन आणि बूथस्थरीय संघटना मजबूत करण्याचे काम केले जाईल. सरकार योजनांच्या माध्यमातून जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे काम करेल, अशी या ट्रिपल एस मॉडेलची संकल्पना आहे.
यासोबतच लखनौमध्ये वास्तव्याच्या दरम्यान, मोहन भागवत यांनी अवैध गोरक्षकांशी आणि कानपूरमधूल कानपूर विभागातील स्वयंसेवक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची माहिती आहे. याशिवाय आरएसएस स्वयंसेवकांकडून घरोघरी संपर्क मोहीम, हिंदू संमेलने आणि शाखा विस्तार यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
लखनौ दौऱ्यादरम्यान मोहन भागवतांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने या बैठकांकडे पाहिले जात आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला काही प्रमाणात फटका बसला होता. विरोधकांच्या पीडीए (पिछडा, दलित, अल्पसंख्याक) फॉर्म्युल्यामुळे आणि भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे काही जागांवर पराभव झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघ नव्या रणनीतीवर काम करत असल्याचे मानले जात आहे. विशेषतः मागास आणि दलित समाजात अधिक प्रभाव निर्माण करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात आरएसएसने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९८० आणि १९९० च्या दशकात राम मंदिर आंदोलनापासून ते २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत संघाच्या कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर प्रभावी काम केल्याचे मानले जाते. यामुळेच भागवत यांच्या या दौऱ्याकडे केवळ संघटनात्मक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर आगामी राजकीय रणनीतीचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे.






