Photo Credit- Social Media द्रौपदी मुर्मूंबाबत सोनिया गांधीच्या त्या वक्तव्याने राजकारण तापणार
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या एका विधानामुळे गोंधळ उडाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपतींनी बोलावलेल्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात महामहिमांच्या भाषणावर सोनिया गांधी यांनी केलेल्या भाष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान पत्रकारांना भेटण्यापूर्वी राहुल, सोनिया आणि प्रियांका संसद भवनासमोर एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान, जेव्हा राहुल गांधींनी राष्ट्रपतींचे भाषण आवडले का असे विचारले असता सोनियां गांधी यांनी ” Poor Lady” ( बिचारी महिला)”असं उत्तर दिलं. त्यांच्या याच वक्तव्याने आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Devendra Fadnavis: ‘यमुने’वरून राजकारण तापलं; फडणवीसांची केजरीवालांवर टीका; म्हणाले, “तुम्ही आताच
संसदेच्या कामकाजानंतर, संसदेच्या बाहेर राहुल गांधी आणि सोनिया गांधी आपापसात बोलत होते. राहूल गांधी यांनी सोनिया गांधी यांना, राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे वाटले,राष्ट्रपती फक्त जुन्या गोष्टी पुन्हा सांगत आहेत. अशी म्हटलं. त्यावर सोनिया म्हणाल्या की, “राष्ट्रपती खूप थकलेल्या दिसल्या. त्या मोठ्या मोठ्या कष्टाने बोलत होत्या, बिचाऱ्या.” अशी प्रतिक्रीया दिली. पण त्याचवेळी मीडिया कर्मचाऱ्यांचा कॅमेरा आणि माइक चालू होता, ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाला.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की,”सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि महिलांच्या नेतृत्वाखाली भारताला सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवते. नारी शक्ती वंदन कायदा हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय, सरकार महिलांसह तरुणांवर विशेषतः लक्ष केंद्रित करत आहे.
‘डब्बा कार्टेल’चा टीझर प्रदर्शित; साई ताम्हणकर, ज्योतिकासह शबाना आझमी दिसणार
महामहिम मुर्मू म्हणाल्या की, सरकारने एक राष्ट्र एक निवडणूक आणि वक्फ सुधारणा विधेयकासारख्या कायद्यांवर जलद पावले उचलली आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी असेही सांगितले की, सरकार अभूतपूर्व कामगिरीद्वारे भारताच्या विकास प्रवासाच्या या अमृत काळाला नवीन ऊर्जा देत आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, “एक राष्ट्र, एक निवडणूक आणि वक्फ दुरुस्ती विधेयक यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे जलद गतीने पुढे नेण्यात आले आहेत.
महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या संगम दुर्घटनेचा उल्लेख करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “ऐतिहासिक महाकुंभ सुरू आहे. हा आपल्या सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक प्रबोधनाचा उत्सव आहे. भारत आणि जगभरातील कोट्यवधी भाविकांनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले. पण मौनी अमावस्येच्या दिवशी घडलेल्या अपघाताबद्दल मी शोक व्यक्त करते आणि जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करते.