नवी दिल्ली : दिल्लीत जंतरमंतर मैदानावर कुस्तीपटुंच निदर्शने सुरुच आहे. अशातच या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. क्रीडा मंत्रालयाने (Sports Ministry) भारतीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India)) निवडणुकीवर बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कुस्ती महासंघाच्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर पुन्हा एकदा धरणे आंदोलन सुरू केले असताना क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
[read_also content=”नागपुरात हिंगणा एमआयडीत ॲग्रो कंपनीत लागली आग; चार कामगारांचा धुराने गुदमरून मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/four-workers-died-due-to-smoke-suffocation-in-fire-at-agro-company-in-hingana-midc-nagpur-390925.html”]
तर दुसरीकडे, विनेश फोगट आणि इतर सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Indian Olympic Association to constitute an ad-hoc committee to conduct elections of the Executive Committee of the Wrestling Federation of India (WFI) within 45 days of its formation and to manage the day-to-day affairs of WFI. pic.twitter.com/qDyJ8Moozn — ANI (@ANI) April 24, 2023
क्रीडा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय ऑलिम्पिक संघटना भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या कार्यकारिणीच्या निवडणुका 45 दिवसांच्या आत घेण्यासाठी आणि दैनंदिन व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी तदर्थ समिती स्थापन करेल. भारतीय कुस्ती महासंघ करेल ही समिती खेळाडूंची निवड करेल आणि फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजावरही लक्ष ठेवेल.
Wrestling Federation of India elections that are scheduled to be held on 7th May have been put on hold: Sources — ANI (@ANI) April 24, 2023