
Eknath Shinde, Shivsena, MLC Election 2026, Kshitij Thakur, Thane Politics, Maharashtra Politics,
एकनाथ शिंदे म्हणाले की, कालचा दिवस हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या या कृतीचा मी निषेध करतो. लोकशाहीत प्रत्येकाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे; मात्र याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढण्याची ही कोणती पद्धत? ” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि त्यातून घटनात्मक संस्था उभ्या राहिल्या. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढणे आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. अशी टिका त्यांनी यावेळी केली.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून सुरू असलेल्या आंदोलनावरही शिंदे यांनी टीका केली. मतदारांची नावे कमी झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधक आंदोलन करत असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ उपलब्ध असल्याचा उल्लेख करत, कोणावर अन्याय होऊ नये यासाठी प्रक्रिया असल्याचे शिंदे म्हणाले. विरोधकांच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, इंडिया आघाडीने मतदार यादीतील कथित अनियमितता, SIR प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Mumbai Water Cut 2026: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! BMCचा इशारा; गैरवापर केल्यास थेट कारवाई
“देशात आणीबाणी असती, तर त्यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत आंदोलन घेऊन जाता आले असते का? आज प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. मग न्यायव्यवस्थेचा अपमान करणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आंदोलने करणे हाच विरोधकांचा अजेंडा असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.
ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना दुःखद असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांशी चर्चा केल्याची माहिती दिली. “या घटनेचा तपास सुरू आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असे शिंदे म्हणाले. या प्रकरणात तपासातून काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.