Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमधील शीतळा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण जखमी

नालंदा येथील शीतळा देवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत किमान आठ महिलांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2026 | 12:56 PM
Stampede at Sheetala Devi Temple in Nalanda 8 women dead bihar news update

Stampede at Sheetala Devi Temple in Nalanda 8 women dead bihar news update

Follow Us
Follow Us:

Nalanda Stampede : बिहार : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालंदा येथील शीतळा देवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत किमान आठ महिलांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर मंगळवारी शीतळा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. आज चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने गर्दी आणखी वाढली होती. अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे लोक पळून जाऊ लागले मात्र यामुळे अनेक महिला चिरडून मरण पावल्या आहेत. (Bihar News)

या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय दंडाधिकारी (एसडीपीओ) आणि जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चेंगराचेंगरीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार,अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांचा अपुरा फौजफाटा यामुळे भाविक जास्त घाबरले आणि पळू लागले. चेंगराचेंगरी झाल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोघांची ओळख पटली आहे.

हे देखील वाचा : India Census 2027: देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले! एप्रिल २०२६ पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात

यामध्ये रीटा देवी (५०), दिनेश राजक यांच्या पत्नी, रा. शकुंत आणि रेखा देवी (४५), कमलेश प्रसाद यांच्या पत्नी, रा. नूरसराई, मथुरापूर अशी चेंगराचेंगरी झालेल्या मृतांमधील दोघींची ओळख पटली आहे. घटनेमध्ये जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भीषण अपघात चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला (शीतला अष्टमी), शेवटच्या मंगळवारी घडला. आजच्या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

हे देखील वाचा :नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट; तृतीयपंथी व्यक्तीची थेट पोलीस ठाण्यात धाव

शीतला अष्टमीला परंपरिक इतिहास 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार शरीफपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मघरा गावात, शीतला अष्टमीच्या दिवशी घरातील चूल न पेटवण्याची आणि आदल्या दिवशी तयार केलेले थंड (शिळे) अन्न देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची पारंपरिक प्रथा आहे. अष्टमीच्या दिवशी मंदिरात लांबच लांब रांगा लागतात, ज्यामुळे प्रचंड गर्दी होते आणि चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होतो. बिहारमधील नालंदामध्ये ही घटना घडली. यामुळे भाविकांसाठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले!

भारतातील जनगणेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त, मृत्युंजय कुमार नारायण यांनी २०२७ च्या जनगणनेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जनगणनेची तयारी आता प्रगत टप्प्यावर पोहोचली आहे आणि अवघ्या काही दिवसांतच अनेक राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील – घरांची यादी आणि गृहगणना – क्षेत्रीय कामाला सुरुवात होईल. जनगणना दोन टप्प्यांत घेतली जाते आणि यावेळी माहिती संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल.”

“या प्रक्रियेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतात. जमिनीवरील काम पूर्ण करण्यासाठी त्यांची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली जाते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना आहे. ही जनगणना पूर्णपणे गोपनीय असून तिची माहिती आरटीआयद्वारेही सार्वजनिक केली जाणार नाही. राज्य सरकारची यंत्रणा ही जनगणना प्रक्रिया पार पाडेल. ही जनगणना प्रक्रिया गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जाईल, ज्यांचे मंत्रालय राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश जारी करेल.” असंही मृत्युंजय कुमार नारायण यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Stampede at sheetala devi temple in nalanda 8 women dead bihar news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Bihar News
  • crime news
  • daily news

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.