Student And Principal Died In Accident After Collision Between School Bus And Truck In Barmer Nrps
क्रीडा स्पर्धेत खेळून परतणाऱ्या स्कूल बस आणि ट्रकची भीषण धडक, प्राचार्यासह विद्यार्थ्याचा मृत्यू, 27 जखमी
बाडमेरमध्ये स्कूल बस आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली आहे. ज्यामध्ये प्राचार्य आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 27 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही बस मॉडर्न स्कूल देटणीची असल्याचे सांगण्यात येत आहे. सांचोर क्रीडा स्पर्धेत खेळून मुली परतत होत्या.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात शनिवारी रात्री स्कूल बस आणि ट्रकमध्ये भीषण (collision between school bus and truck) टक्कर झाली. या अपघातात शाळेचे मुख्याध्यापक आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर शिक्षकांसह २७ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील तीन मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. ज्यांच्यावर जोधपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे.
[read_also content=”नागपुरात अतिवृष्टीनंतर पूर, अर्धांगवायू झालेल्या महिलेसह चार जणांचा मृत्यू! ऑरेंज अलर्ट जारी https://www.navarashtra.com/maharashtra/four-people-died-including-a-paralyzed-woman-due-to-flood-in-nagpur-orange-alert-issued-nrps-461232.html”]
कसा झाला अपघात?
शनिवारी रात्री बारमेर जिल्ह्यातील रामसर पोलीस स्टेशन हद्दीतील सेहलाऊ गावाजवळ भरतमाला रोडवर हायवा ट्रक (डंपर) आणि स्कूल बसची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बस चक्काचूर झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि जोधपूरला रेफर करण्यात आले आहे. माहिती मिळताच बाडमेरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अंजुम ताहिर सामन, एसपी दिगंत आनंद यांनीही जिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींवर उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.
प्राचार्यासह एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन विद्यार्थी गंभीर
अतिरिक्त जिल्हाधिकारी अंजुम ताहिर समा यांनी सांगितले की, रामसर पोलिस स्टेशन हद्दीतील भरतमाला रोडवर स्कूल बस आणि हायवे ट्रकमध्ये धडक झाली. बसमध्ये सुमारे 30 जण होते. या अपघातात शाळेचे मुख्याध्यापक आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आले आहे. अपघातातील इतर जखमींवर गगरिया, चौहान आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Web Title: Student and principal died in accident after collision between school bus and truck in barmer nrps