एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारनं नागरिकांना दिलासा दिला आहे. काल सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर दोन वर्षांसाठी कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर आता १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
आधी लिंबू नतंर टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गृहिणींनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, वाढत्या या महागाईत खाद्यतेल स्वस्त करून सरकारने गृहिणींना दिलासा दिला आहे. अशातच आता साखरेचे दर कमी करण्याचा निर्णय सरकराने घेतला आहे. यंदा देशात साखरेचं विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे साखर स्वस्त होणार आहे.
[read_also content=” खेड घाटातील दरड धोकादायक ; पावसाळ्यात ठरू शकते जीवघेणी https://www.navarashtra.com/maharashtra/the-cracks-in-the-khed-ghat-are-dangerous-it-can-be-fatal-in-the-rainy-season-nrab-284440.html”]
मोदी सरकारनं यंदा साखरेच्या निर्यातीचं प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 2021-22 साखर हंगामात निर्यातदार 100 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात साखरेच्या साठ्याबाबत कोणतीही चिंता नसून, गेल्या सहा वर्षांतील साखरेची निर्यात यंदा सर्वाधिक असल्यानं खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पर्यायी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.






