सौजन्य : सोशल मीडिया
लखनौ : मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, असं स्टेट्स (Status on WhatsApp) ठेवत दोन मित्रांनी आत्महत्या केली. या दोन मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी ओशो यांचे प्रवचन ऐकल्याची माहिती दिली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन येथे घडली.
बालेंद्र पाल आणि अमन वर्मा अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांनीही आयुष्य संपवण्याआधी ओशोंचे प्रवचन ऐकले होते. त्यानंतर दोघांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाला. बालेंद्रचा मृत्यू जागीच झाला. तर अमनची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्याने त्याच्या घरातील लोकांना फोन केला होता आणि विषारी पदार्थ खाल्ल्याची माहिती दिली.
दरम्यान, ही माहिती मिळताच अमनच्या घरातल्यांनी अमन आणि बालेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, बालेंद्रचा मृत्यू घरीच झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच अमनवर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या चौकशीदरम्यान हे समजलं आहे की, अमन आणि बालेंद्र या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. अमन मेडिकल स्टोअर चालवत होता आणि त्याचे लग्नही झाले होते. पण बालेंद्रचं लग्न झालेले नव्हते. बालेंद्र अमनला भेटायला येत असे. हे दोघेही ओशोंची प्रवचनं ऐकत असत. ओशोंच्या विचारांचा या दोघांवर खूप प्रभाव होता.
स्टेट्स ठेऊन आत्महत्या
मृत्यू हेच सत्य आहे असं स्टेट्स दोघांनीही ठेवले होते. तसेच जळणारी चिता, प्रेतयात्रा असे एकूण तीन फोटो त्यांनी स्टेटसला ठेवले होते. त्यामुळे या दोघांनी ओशोंचे प्रवचन ऐकूनच आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.