शिक्रापुरात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या; सकाळी कुटुंबीय उठवायला गेले अन्... (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश काळजे (वय २७ वर्षे रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) असे या तरूणाचे नाव आहे. आकाश हा कुटुंबियांसह जेवण करुन रात्रीच्या सुमारास घरात झोपलेला होता. सकाळी सर्वजण उठले तरी आकाश बाहेर येत नसल्याने घरच्या मंडळींना संशय आला. त्यांनी पाहिले असता आकाशने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
आकाश जेवण झाल्यानंतर झोपला असावा म्हणून कोणी आवाज दिला नाही. मात्र, अकरा वाजले तरी आकाश बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला. फोनची रिंग वाजत असून देखील आकाश फोन उचलत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी खिडकीतून पाहिले असता आकाशने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आकाश याला तातडीने उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी आकाश उद्धवराव काळजे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत अजय उद्धवराव काजळे (वय २७ वर्षे रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
नाशिकमध्ये प्राध्यापकाची आत्महत्या
नाशिकच्या जेल रोड भागात एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर या व्यक्तीने स्वतः साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. लता मुरलीधर जोशी (वय 76) आणि मुरलीधर रामचंद्र जोशी (वय 80) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. मुरलीधर जोशी हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी चर्चेचं कारण ठरत आहे.