ग्वाल्हेर – एकाच दिवसांत दोन विमान दुर्घटनांची प्रकरणं घडल्यानं सगळा देश हादरला आहे. राजस्थानात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात (Rajsthan Plane Crash) दोन जण गेल्याची भीती वर्तवण्यात येतेय. तर दुसऱ्या अपघातात मध्य प्रदेशात हवाई (Madhya Pradesh Plane Crash) दलाच्या दोन लढाऊ विमानही कोसळल्यानं मोठा अपघात झालाय. सुखोई-30 (Sukhoi-30) आणि मिराज 2000 (Mirage 2000) अशी ही दोन विमान सरावादरम्यान, कोसळली. अपघातानंतर ही दोन्ही विमानं वेगवेगळ्या ठिकाणी कोसळली असल्याची माहिती आहे. यातील एक विमान राजस्थानातील भरतपूरमध्ये तर दुसरं विमान मध्य प्रदेशात मुरैनात कोसळलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अद्याप या दोन्ही विमानांचा शोध सुरु असून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
[read_also content=”ठाकरे गट-वंचित युतीबाबत शरद पवार नाराज? मविआसोबत वंचितच्या आघाडीबाबत स्पष्ट म्हणाले https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-upset-about-thackeray-group-vanchit-lliance-nrps-365084.html”]
या अपघातात किती जण मृत पावले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र 2 ते 3 जण अपघातात मृत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेरच्या एयरबेसवरुन टेक ऑफ केले होते. मुरैना जिल्ह्यात ज्या ठिकाणी विमान कोसळले आहे, तिथे मदतकार्य सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाल्याचं सांगण्यात येतंय.
A Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft have crashed near Morena, Madhya Pradesh. Details awaited. Search and rescue operations launched: Defence Sources pic.twitter.com/p1WhVtjZEZ
— ANI (@ANI) January 28, 2023