कार्यपालिका न्यायालय अन् न्यायाधीश बनू शकत नाही; 'बुलडोझर' कारवाईवर सरन्यायाधीशांचं परखड मत
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पादर्शकता ठेवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संपत्ती जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर याबाबत पूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. आत्तापर्यंत 33 न्यायाधीशांपैकी 21 न्यायाधीशांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीशांचा देखील समावेश असणार आहे. यामुळे जनतेमध्ये जागरुकता वाढले. तसेच पारदर्शी कारभार आणि जनतेला माहिती उपलब्ध होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाचही कॉलेजियम न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी आपल्या नावावर नोएडामध्ये २ बीएचके फ्लॅट, अलाहाबादमध्ये एक बंगला आणि उत्तर प्रदेशमध्ये पिढीजात शेतजमीन असल्याचे नमूद केलं आहे. तसेच, दीड कोटीची गुंतवणूकदेखील आहे. न्यापमूर्ती सूर्यकांत यांच्या नावावर चंदीगढ़, मुरग्राम आणि दिल्लीत पनीसह संयुका मालकी असलेल्या मालमत्ता आहेत. तसेच, एफडीमध्ये 06 कोटी 03 लाख रुपये आहेत. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी पाध्यानावे अहमदाबादमध्ये दोन घरे आहेत. शिवाय, म्युच्युअल फंडमध्ये 60 लाख रुपये, पीपीएफमध्ये 20 लाख रुपये, 50 लाखांचे दागिने आणि 2015 ची मारुती स्विफ्ट कार आहे. न्यायमूर्ती सुधांशू पुलिया पांच्याकडे 2008 चे मंडिल असलेली मारुती ड्रोन एस्टिलो कार आहे. त्याव्यतिरिक्तची सर्व संपत्ती ही आपण न्यायाधीश बनण्याआधीची असून त्यात कोणतीही भर पडलेली नाही, असं त्यांनी नमूद केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची संपत्ती किती?
सुप्रीम कोर्टाच्या वेबासाईटवर दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावे बँकेत 55 लाख 75 हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आणि 1 कोटी 06 लाख रुपयांचा पीपीएफ आहे. याशिवाय, सरन्यायाधीश खन्ना यांच्यानावे दक्षिण दिल्लीत 2 बीएचके डीडीए फ्लॅट असून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये 4 बीएचके फ्लॅटदेखील आहे. त्याव्यतिरिक्त गुरगावमध्ये त्यांच्या मुलीसह संयुक्त मालकी असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांच्यानाचे 56 टक्के हिस्सा आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फाळणी पूर्वीपासूनची त्यांची पिढीजात जमीनदेखील त्यांच्या नावे आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भावी सरन्यायाधिशांची संपत्ती किती?
येत्या काही दिवसांत सरन्यायाधीशपदाचा कार्यभार न्यायमूर्ती बी. आर. गवई स्वीकारणार आहेत. १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणारे गवई यांच्या संपत्तीचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, भावी सरन्यायाधीशांच्या नावे बँकेत 19 लाख 63 हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात 06 लाख 59 हजार रुपये आहेत. याशिवाय अमरावतीमध्ये पिढीजात घर, मुंबई आणि दिल्लीत फ्लॅट अशा मालमत्तेचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्याशिवाय, अमरावती आणि नागपूरमध्ये त्यांची पिढीजात शेतजमीनहीं आहे. तसेच, तब्बल 1 कोटी 30 लाखांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे.