भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले असून, हे बदल प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच गैरवापर रोखण्यासाठी 1 जुलै 2025 पासून अंमलात येणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या सुधारणांची घोषणा केली असून, तात्काळ बुकिंग प्रक्रियेत आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
आता १ जुलैपासून आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे. तर १५ जुलैपासून आधार ओटीपी द्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येईल. याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. तात्काळ तिकीट बुकिंग करताना नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वेच्या तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असल्याचं जाहीर केलं. या सुधारणा यूजर्सचे प्रमाणीकरण अधिक काटेकोर करणे आणि तात्काळ तिकिटांचा गैरवापर कमी करण्याच्या उद्देशाने केल्या आहेत.
काय हाये नवीन बदल?
1. आधार प्रमाणीकरण अनिवार्य (1 जुलैपासून)
1 जुलै 2025 पासून IRCTC संकेतस्थळ किंवा मोबाइल अॅपद्वारे तात्काळ तिकिट बुकिंग फक्त अशाच वापरकर्त्यांना करता येईल ज्यांचे खाते आधार कार्डने प्रमाणीकरण झालेले असेल. याचसोबत 15 जुलै 2025 पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल. यामुळे एजंटकडून होणारी बल्क बुकिंग, फेक आयडीचा वापर, आणि दलालांचा हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न आहे.
2. पीआरएस काउंटर व एजंट बुकिंगसाठी ओटीपी अनिवार्य
पीआरएस काउंटरवर किंवा अधिकृत एजंटांद्वारे बुक केल्या जाणाऱ्या तात्काळ तिकिटांसाठी देखील 15 जुलैपासून मोबाईल ओटीपी पडताळणी आवश्यक राहणार आहे.
3. अधिकृत एजंटसाठी बुकिंग वेळेवर निर्बंध
तात्काळ तिकीट बुकिंगच्या पहिल्या 30 मिनिटांत एजंटना तिकीट बुक करता येणार नाही.
सीआरआयएस आणि आयआरसीटीसीला प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे आणि सर्व विभागीय रेल्वे आणि संबंधित विभागांना त्यानुसार माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्रालय सर्व प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केलं आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयआरसीटीसी यूजर प्रोफाइलशी आधार जोडणी पूर्ण केल्याची खात्री करुन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Nagpur News : सत्रापूर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार