एन चंद्राबाबू नायडू पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमरावतीच्या थांबवलेल्या विकासाला चालना मिळाली आहे. विभाजनाच्या 10 वर्षानंतर देखील राजधानीचे भवितव्य आणि भौगोलिक स्थान कायम होते. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 1 मार्च 2014 नुसार 2 जून 2024 पासून हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल. यावेळी एनडीएच्या बैठकीत एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. अमरावतीच होणार आंध्र प्रदेशची राजधानी… असं यावेळी म्हणाले.
अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल. टीडीपी, भाजप आणि जनसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला नायडू संबोधित करत होते. बैठकीत त्यांची आंध्र प्रदेश विधानसभेतील एनडीए नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तसेच आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. आमची राजधानी अमरावती आहे. राज्याच्या विभाजनानंतर अमरावती ही राजधानी आहे. 2014 ते 2019 या काळात ते मुख्यमंत्री होते. नायडू यांनी अमरावतीला राजधानी बनवण्याची कल्पना मांडली होती.
2019 मध्ये त्यांची सत्ता गमावल्याने नायडू यांच्या कल्पनेला धक्का बसला आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीने जबरदस्त विजय मिळवला. त्यानंतर रेड्डी यांनी अमरावती शहराच्या योजना रद्द केल्या आणि तीन राजधान्यांची नवीन कल्पना मांडली, ज्याची जागा आता एकच राजधानी ठेवण्याच्या निर्णयाने नायडूंनी घेतली आहे.
आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपी, भाजप आणि जनसेना यांच्या युतीचा एकतर्फी विजय झाला. विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला 164 जागा मिळाल्या. तर लोकसभा निवडणुकीत 21 जागांवर प्रचंड बहुमताने विजय मिळवला. या आदेशामुळे अमरावतीला राजधानी बनवण्याच्या योजनेत नवसंजीवनी मिळाली आहे.