Telangana Election
Telangana Election

    Telangana Election 2023 : राजस्थान विधानसभेसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यानंतर तेलंगणा विधानसभेसाठी मतदान होईल. तेलंगणाची लोकसंख्या साधारण साडेतीन कोटी इतकी आहे. तेलंगणामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या १३ टक्के इतकी आहे. राजकीय जाणकारांच्या आकलनानुसार राज्यातल्या ११९ जागांपैकी एक तृतीयांश जागांवर मुस्लिमांची मतं प्रभाव टाकतात. म्हणजे तेलंगणातील ४६ जागांवर मुस्लिम मतदारांचं मतदान निर्णायक ठरते.
    लोकसभा निवडणुकीतदेखील त्याचे परिणाम
    तेलंगणा निवडणुकीत उतरलेल्या पक्षांची मुख्य लढत ‘बीआरएस’सोबत असली तरी काँग्रेस आणि भाजपने ज्या पद्धतीने राजकीय वातावरण केले आहे. त्यावरून इतर राज्यांत आणि लोकसभा निवडणुकीतदेखील त्याचे परिणाम दिसून येतील.
    मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण काढून घेण्याची घोषणा
    भाजपने तेलंगणामध्ये जाहीरपणे मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण काढून घेण्याची घोषणा केली. तर काँग्रेसने एम फॅक्टरच्या माध्यमातून मोठी खेळी केल्याचं दिसून येतंय. राजकीय विश्लेषक सांगतात की, राज्यात निवडणुकीचा निकाल काहीही येवो परंतु एम फॅक्टरच्या अनुषंगाने देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत तेलंगण निवडणुकीचा प्रभाव पडेल.