हगवणे कुटुंबाला फाशीची शिक्षा द्या! सामाजिक संघटनांची होती मागणी
जेव्हा वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू झाला तेव्हा पुण्यात वेगवेगळ्या संघटनांनी कोर्टाबाहेर आंदोलन केली होती. अनेक महिलांनी आक्रोश व्यक्त करत त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र आता कोर्टाकडून हे सगळ प्रकरण पुन्हा ऐकून घेतलं जाईल आणि त्या नंतर कोर्ट शिक्षा सुनावू शकत. मात्र सहा जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
सहा जणांवर आरोप काय ?
आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ मारहाण, कट रचणे तसेच पुरावे लपवण्याचे आरोप आहेत.
पती शशांक हगवणे याच्यावर मारहाण करणे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे
सासू आणि सासरे यांनी मानसिक छळ करणे
निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे आणि धमकावल्याचा अतिरिक्त आरोप आहे.
वैष्णवी च्या मृत्यू नंतर काय काय झाल होत ?
१६ मे ला वैष्णवी हागवणेची आत्महत्या झाली होती. तिचा मृतदेह हा घरात आढळून आला होता. १७ मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. आता न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून खटल्याची सुनावणी २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
Ans: सासरच्या छळामुळे वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
Ans: पती-सासूसह एकूण सहा जणांवर.
Ans: हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, मानसिक छळ व पुरावे लपवणे.






