दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epestein शी मैत्री नडली; एक ईमेलनं 'ते' काळे सत्य आले बाहेर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या न्याय विभागाने उघड केलेल्या कागदपत्रांनुसार, सुलतान अहमद बिन सुलायम आणि एपस्टीन यांच्यात घनिष्ठ संबंध होते. कागपत्रांनुसार, दोघांमध्ये २००९ ते २०१८ दरम्यान अनेकदा ईमेलद्वारे संवाद झाला आहे. या इमेलमध्ये दोघांनीह महिला आणि व्यवसायाबद्दल चर्चा केली आहे. एका ईमेलमध्ये सुलतायम यांनी एपस्टीनला आपल्या यॉटवर रशियन तरुणी असल्याचा उल्लेख केला होता.
तर एपस्टीनने त्यांना एक टॉर्चर व्हिडिओबद्दल विचारले होते. व्हिडिओ नेमका कशावर होता याचा कोणताही स्पष्ट उल्लेख ईमेलमध्ये आढळलेला नाही. पण हे उघड झाल्यानंतर सुलायम मोठ्या वादात सापडले आहेत. कागपत्रांनुसार, दोघांमध्ये अनेकदा सुलायम यांच्या खाजगी बोटीवर भेटही झाली असल्याचे उघड झाले आहेत.
या खुलाशानंतर डीपी वर्ल्डवर जागतिक स्तरावरुन दबाव वाढत होता. ब्रिटिश डेव्हलपमेंट फायनान्स एजन्सी आणि कॅनडाच्या पेन्शन फंडने गुंतवणूक बंद करण्याची धमकी दिली होती. यामुळे कंपनीची प्रतिमेला धक्का पोहचून परदेशी गुंतवणूकीवर परिणाम होऊ लागला होता. यामुळे सुलायम यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. डीपी वर्ल्डचे कामकाज भारतासह अनेक देशांमध्ये पसरलेले आहे.
दुबई (Dubai) मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, एस्सा काझिम यांची बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर भारतीय वंशाचे प्रिन्स नारायण यांना समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. २००४ पासून नारायण डीपी वर्ल्ड कंपनीशी जोडले गेल आहेत. त्यांची नियुक्ती कंपनीला संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल असा दावा केला जात आहे. नारायण यांना व्यापार आणि वित्त नियोजनाबाबत प्रदीर्घ अनुभव आहे.
डीपी वर्ल्ड ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची बंदर ऑपरेटर कंपनी आहे. जगातील एकणू कंटनेर व्यापारापैकी जवळपास १०% वाटा या कंपनीकडे आहे. भारतातही डीपीवर्ल्डची मोठी गुंतवणूक आहे. सध्या नारायण यांच्यासमोर कंपनीची प्रतिमा सुधारुन जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे मोठे आवाहन आहे.
Ans: जेफ्री एपस्टीन फाइल्समध्ये डीपी वर्ल्डचे सीईओ सुल्तान अहमद बिन सुलायम यांचे नाव समोर आले असून कंपनीवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला होता. यामुळे सुलायम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, एस्सा काझिम हे दुबईच्या डीपी वर्ल्डचे नवे चेअरमॅन आणि भारतीय वंशाचे प्रिन्स नारायण कंपनीचे नवे CEO आहेत.






