जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) डोके वर काढले आहे. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे. भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. याबाबतील पुन्हा खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
[read_also content=”“नियमांचं पालन करा अन्यथा भारत जोडो यात्रा थांबवा” आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं राहुल गांधींना पत्र https://www.navarashtra.com/india/mansukh-mandviya-wrote-letter-to-rahul-gandhi-on-to-follow-corona-rules-in-bharat-jodo-yatra-nrps-355342.html”]
“कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आपल्यातील अनेकांना जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देश ठप्प झाला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचं लक्ष असेल. असं भारती पवार यांनी म्हण्टलंय.
चीनच्या परिस्थितीवरून भारताना धडा घेत आधीच खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्याच ठरवलं आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिलं आहे. ‘भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. यात्रेत होणारी गर्दी पाहता खबरदारी घेण्याची गरज आहे. जर यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असं देखील मांडवीय यांनी म्हण्टलय.