दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंह यांचे विरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. तसेच ब्रिजभूषण यांचे विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. तसेच, लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर आता या कोर्टात केस दाखल असताना, पीडितेकडून वकिलांनी लैंगिक छळाचा व्हिडीओ कोर्टात दाखल करण्यात आला आहे.
#WATCH | We asked for directions for FIR to be filed against accused Brij Bhushan Sharan Singh. Despite serious allegations of harassment, Delhi Police wasn't filing the complaint. SC found the matter serious & issued notices to Delhi govt & Delhi Police: Wrestler's advocate pic.twitter.com/Kb7DXOr1cz — ANI (@ANI) April 25, 2023
मंगळवारी सिब्बल यांनी न्यायालयासमोर सांगितले की, जर पोलिस गुन्हा नोंदवत नसतील, तर सीआरपीसीच्या कलम 166A मध्ये दुरुस्ती केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यावर सरन्यायाधीश म्हणाले, ‘आम्ही बघू.
तीन महिन्यांत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि अनुभवी विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंनी सांगितले की, पोलिसांनी अद्याप त्यांची तक्रार नोंदवली नाही. विनेश म्हणाल्या की, ब्रिजभूषण यांना भाजप नेता असल्याचा फायदा मिळत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र त्यांचा दृष्टीकोन नेहमीच पक्षपाती राहिला आहे, असे ते म्हणाले. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींपैकी १२ मुली चौकशी समितीसमोर हजर झाल्या आहेत. त्यांना अजून काय हवंय? दरम्यान, कुस्तीपटूंनी खाप नेते, महिला संघटना आणि राजकारण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.