Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल बंपर वाढ, जर बजेटमध्ये झाल्या ‘या’ 3 महत्त्वाच्या घोषणा, घ्या जाणून?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारम (Nirmala Sitaraman) या 1 फेब्रुवारीला यावर्षीचं बजेट संसदेत सादर करणार आहेत. या बजेटकडून सर्वसामान्य भारतीयांच्या (India) मोठ्या अपेक्षा आहेत. पायाभूत सोयीसुविधांबाबत मोठा निधी आणि कल्याणकारी योजनांवर मोठा खर्च या बजेटमध्ये करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 28, 2023 | 01:56 PM
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल बंपर वाढ, जर बजेटमध्ये झाल्या ‘या’ 3 महत्त्वाच्या घोषणा, घ्या जाणून?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारम (Nirmala Sitaraman) या 1 फेब्रुवारीला यावर्षीचं बजेट संसदेत सादर करणार आहेत. या बजेटकडून सर्वसामान्य भारतीयांच्या (India) मोठ्या अपेक्षा आहेत. पायाभूत सोयीसुविधांबाबत मोठा निधी आणि कल्याणकारी योजनांवर मोठा खर्च या बजेटमध्ये करण्यात येईल, अशी शक्यता आहे. तसंच आयकरातून सूट मिळण्यासाठी असलेल्या मर्यादेत बदल होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. या सोबतच जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या, तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांची डीएत वाढ करण्याची मागणी, राहिलेल्या डीएची पूर्तता करणे आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करावी, अशा 3 मागण्या आहेत. सरकार या बजेटमध्ये या 3 मागण्या मान्य करेल अशी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.

18 महिन्यांच्या डीएचे पैसे द्यावेत ही मागणी

वाढत्या महागाईपासून सुटका मिळवण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी सरकार करु शकतं. त्याहीपेक्षा कर्मचाऱ्यांनी मागणी आहे की गेल्या 18 महिन्यांचा प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा. कर्मचारी गेल्या काही काळापासून या महागाई भत्त्याची मागणी करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 18 महिन्यांसाठी थांबवण्यात आलेला आहे. कोरोना काळ संपल्यापासून कर्मचाऱ्यांकडून हे पैसे देण्यात यावेत अशी मागणी होतेय. या कर्चाऱ्यांचा जानेवारी 2020 ते जून 2021 या काळातील महागाई भत्ता थांबवण्यात आलेला आहे.

फिटमेंट फॅक्टर

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दुसरी मागणी ही फिटमेंट फॅक्टर वाढवावा ही आहे. जर हा निर्णय सरकारनं घेतला तर कर्मचाऱ्यांचा किमान पगार वाढणार आहे. हा निर्णय झाल्यास पगार 18 हजारांवरुन 26 हजार होईल. म्हणजेच किमान वेतनात साधारण 8 हजार रुपयांनी वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरुन 3.68 टक्के करण्याची मागणी आहे.

महागाई भत्त्यात वाढीची अपेक्षा

सरकार वर्षभरात दोन वेळा साधारणपणे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते. साधारणपणे जानेवारी आणि जुलैत ही वाढ करण्यात येते. महागाई भत्त्यात करण्यात येणारी पहिली वाढ ही 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येत असलेल्या बजेटच्या वेळी करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यामुळं होळीच्या आधी त्यांच्या पगारात वाढ होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 38 टक्के आहे.

Web Title: There will be a bumper increase in the salary of government employees if these 3 important announcements are made in the budget do you know nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2023 | 01:56 PM

Topics:  

  • BJP
  • Budget
  • Congress
  • india
  • maharashtra
  • narendra modi
  • पगार

संबंधित बातम्या

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
1

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
3

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
4

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.