नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अनेक नेतेमंडळी, मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘हे फक्त संसद भवन (Sansad Bhavan) नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. हे नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाचा साक्ष बनेल’, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. त्यापूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुजा आणि होमहवन करण्यात आले. या पुजेनंतर त्यांनी तेथे उपस्थित सेंगोल घेऊन साधू-संतांचे आशीर्वाद घेतले. या भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हे फक्त संसद भवन नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. 28 मे, 2023 रोजी देशातील जनतेला ही नवी भेट मिळाली आहे. हे नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाचा साक्ष बनेल. देशातील विकासाच्या प्रवासातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
आमचं संविधान हाच आमचा संकल्प
जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. आपल्या भारत देशाचा नवा संकल्प आता जगाला दिसणार आहे. आमचं संविधान हाच आमचा संकल्प आहे. लोकशाही केवळ व्यवस्था नाहीतर संस्कार, विचार, परंपरा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
विकासकामांमुळे मला आनंद
गेल्या 9 वर्षांत चार कोटी गरीबांचे घर बनल्यामुळे मला आनंद आहे. तसेच या कालावधीत 11 कोटी शौचालय बांधल्याने या विकासकामामुळे आनंदित आहे. गावांना जोडण्यासाठी 4 लाखांपेक्षा जास्त किमी रस्त्यांची निर्मिती केली, असेही त्यांनी सांगितले.