नवी दिल्लीः देशातून एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील राम मंदिर (Ram Temple) भाविकांसाठी कधी खुलं होणार याची उत्सुकता असताना आणि याबाबत अधिकृत घोषणा गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी केली असतानाच, या मंदिराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल कायदा (al Qaeda) या दहशतवादी संघटनेने दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं एकच खळबळ माजली असून, परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून, पोलीस फौजफाट मोठ्या प्रमाणत तैनात करण्यात आला आहे.
[read_also content=”राज्यात काही भागात ढगाळ वातावरणामुळं अवकाळी पावसाची शक्यता; अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत… https://www.navarashtra.com/maharashtra/chance-of-unseasonal-rain-due-to-cloudy-weather-in-some-parts-of-the-state-many-crops-are-likely-to-be-hit-farmers-are-worried-359584.html”]
दरम्यान, जिहादी समूहाच्या एका ऑनलाइन पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात गरळ ओकण्यात आली आहे. भारतातील सर्व मुस्लिमांना या जिहादमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. सदर 110 पानांचे नियतकालिक आहे. संपादकीयात म्हटलंय की, ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येतंय, ते पाडलं जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवंय. असं भारतातील मुस्लिमांना आवाहन करण्यात आलं आहे.
पुढे असं ही म्हणण्यात आलंय की, भारतीय मुस्लिमांनी लक्षात ठेवावं की धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदु-मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरू शकते. बाबरी मशीद ३० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबादेत २० वर्षांपूर्वी गर्भवती महिलांना बाळासह पोट कापून जाळण्यात आलं होतं. आज सर्वत्र बुलडोझर चालवण्यात येत आहेत. जामिया मिलिया (इस्लामिया) आणि अलीगडपासून जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) तसेच देवबंद शहरापर्यंत हिंदूंकडून धोका आहे. त्यामुळं तुम्ही जिहाद धर्म वाचविण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन अलं कायद या संघटनेनं केलं आहे.






