पंतप्रधान मोदींच्या विरोधात एक-दोन नव्हे तर तब्बल तीनजण निवडणुकीच्या रिंगणात; वाराणसीत येणार रंगत

देशभरात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जो पक्ष अधिकाधिक जागा जिंकण्याकडे सर्वच पक्षांचा जास्त कल असतो. भाजपने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

  वाराणसी : देशभरात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जो पक्ष अधिकाधिक जागा जिंकण्याकडे सर्वच पक्षांचा जास्त कल असतो. भाजपने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर, देशपातळीवर इंडिया आघाडीने एकत्रितपणे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे.

  नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून हॅट्ट्रिक करणार का की, इंडिया आघाडी तगडे आव्हान देणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्ट्रिक करतील हे नक्की असले तरी विरोधी उमेदवार किती मताधिक्य मिळवितो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भाजपकडून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अखिल भारत हिंदू महासभेने येथून किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांना उमेदवारी देतु, वाराणसीतून लोकसभा रिंगणात उतरवले आहे.

  2019 चा काय होता निकाल?

  2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींनी ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळवून मोठा विजय मिळवला होता. तर समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांना १ लाख ९५ हजार १५० मते मिळाली होती.

  वाराणसीची जागा नरेंद्र मोदी जिंकली

  वाराणसीची जागा नरेंद्र मोदी ०४ लाख ७९ हजार ५०५ एवढ्या फरकाने जिंकली. काँग्रेसच्या अजय राय यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अजय राय यांच्यावरच काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.