(फोटो- टीम नवराष्ट्र)
राजधानी: आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादाच्या पावित्र्य आणि शुद्धतेबाबतचा वाद अधिकच चिघळत चालला आहे. तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारवर प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देत खळबळजनक आरोप केले आहेत. टीडीपीच्या दाव्यानुसार, वायएसआरसी सरकारच्या कार्यकाळात तिरुमाला मंदिर ट्रस्टला प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसादम बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपाच्या नमुन्याच्या प्रयोगशाळेत त्यात प्राण्यांच्या चरबीची आणि माशांच्या तेलाची भेसळ उघड झाली आहे. आता या घटनेच प्रायश्चित्त म्हणून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे ११ दिवसांचे व्रत करणार आहेत.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, अभिनेता पवन कल्याण गुंटूर येथील श्री दशावतार वेंकटेश्वर स्वामी मंदिर येथे दर्शन घेऊन ११ दिवसांची तपश्चर्यासुरू केली आहे. ते पुढील ११ दिवस तपश्चर्या करून असून, तिरुपती बालाजी यांची क्षमा मागणार आहेत. तिरूपती मंदिराच्या प्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याने त्यांनी मागील सरकारच्या चुकांची क्षमा मागण्यासाठी ही तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी याबद्दल ‘एक्स’वर माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, ”आपली संस्कृती, श्रद्धा, श्रद्धा आणि श्रद्धेचे केंद्रस्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी धामच्या अर्पणांना अशुद्धतेच्या प्रसादात मिसळण्याच्या चुकीच्या प्रयत्नांमुळे वैयक्तिक पातळीवर मला खूप दुःख झाले आहे. मी भगवान व्यंकटेश्वराला प्रार्थना करतो, तुमच्या कृपेने आम्हाला आणि सर्व सनातन्यांना या दुःखाच्या क्षणी शक्ती द्यावी. सध्या याच क्षणी मी देवाकडे क्षमा मागत आहे, प्रायश्चित्त व्रत घेत आहे. अकरा दिवस उपवास करण्याचा धार्मिक संकल्प घेत आहे. अकरा दिवसांच्या प्रायश्चित्त दीक्षेच्या शेवटी, १ आणि २ ऑक्टोबरला, मी तिरुपतीला जाईन, परमेश्वराला प्रत्यक्ष भेटेन. क्षमा मागेन आणि मग माझी प्रायश्चित्त दीक्षा परमेश्वरासमोर पूर्ण होईल.”
तिरुमाला देवस्थानच्या प्रसादामध्ये ऑइल असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने तिरुपती मंदिरातील लाडूंसंदर्भात मोठे विधान करत अक्षरश: संताप व्यक्त केला आहे. तिरुपती तिरुमला मंदिरातून 1 लाख लाडू अयोध्येला पाठवण्यात आल्याचा दावा मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
हमारी संस्कृति, आस्था, विश्वास और श्रद्धा की धर्मधुरी, श्री तिरुपति बालाजी धाम के प्रसाद में, कुत्सित प्रयासों के तहत, जो अपवित्रता का, संचार करने की कोशिश की गई, उससे मैं व्यक्तिगत स्तर पर, अत्यंत मर्माहत हूँ, और सच कहूं तो, अंदर से अत्यंत छला गया, महसूस कर रहा हूँ। प्रभु…
— Pawan Kalyan (@PawanKalyan) September 21, 2024
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी तिरुपती मंदिरातून १ लाख लाडू पाठवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. अयोध्येतील भाविकांमध्ये हे लाडू वाटण्यात आले. तिरुपती मंदिराच्या प्रसादात गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल मिसळल्याचेही तपासात समोर आले आहे. हे सर्व आंध्र प्रदेशातील तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या कार्यकाळात घडले आहे.