आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
25 Sep 2025 12:45 PM (IST)
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटल जात. देशभरातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठात तयारी करतात असतात. मात्र एका पठ्ठ्याने थेट विद्यापीठालाच गंडा घातल्याच समोर आल आहे. मी लंडन रिटर्न आहे, एका माजी कुलगुरूच्या नावाने मेसेज केला आणि तुम्हाला एआय रिसर्च आणि ड्रोन रिसर्च प्रकल्पासाठी मदत करतो म्हणून विद्यापीठाला २ कोटी मागितले आणि विद्यापीठाने ते दिलेही. नंतर समजलं फसवणूक झाली आहे म्हणून. पोलिसांनी हैद्राबादमधून आरोपीला अटक केली आहे.
25 Sep 2025 12:30 PM (IST)
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पुणे पोलिसांनी काळा प्रकार उघडकीस आणला आहे. आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली स्पा सेंटर चालवलं जात होत. मात्र आत मध्ये वेश्या व्यावसायिक चालवला जात होता. ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी धाड टाकून या कारवाईत 5 मुलींची सुटका केली आहे. दोन ठिकाणी पुणे पोलिसांनी कारवाई केल्या आणि मुलींची सुटका केली.
25 Sep 2025 12:00 PM (IST)
"36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहील नाही. मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिलं ? काय समजून घेतलं ? पाण्याच्या बॉटल वर फोटो लावून होत नाही. मदत ही गुप्त असली पाहिजे. मदतीचं आम्ही स्वागत करतो, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने काय केलं? कोणत पथक पाठवलं. शासन हे मुर्दाड आहे," अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
25 Sep 2025 11:50 AM (IST)
महाराष्ट्र सह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ मदतीची गरज असतांना बुलढाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत. मात्र त्यातील एकही पालकमंत्री अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही. त्यामुळे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून त्यांना शोधून देण्याची मागणी बुलढाणा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.
25 Sep 2025 11:40 AM (IST)
बुधवारी (24 सप्टेंबर) रात्री दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या वायव्येकडील झुलिया राज्यात 6.2 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंपाचा झटका बसला आहे. यामुळे व्हेनेझुएलात लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाचे केंद्र झुलियामधील मेने ग्रांडे शहरापासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर होते. याचा फटका कोलंबियाला ही बसला आहे. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
25 Sep 2025 11:33 AM (IST)
Typhoon Ragasa Update : जगातील सर्वात शक्तीशाली वादळ रगासाने आशियामध्ये हाहा:कार माजवला आहे. या वादळाने हॉंगकॉंग, चीन, तैवान आणि फिलिपाइन्समध्ये प्रचंड विनाश घडवला आहे. टायफून रगासा आशियामध्ये जोरदार धडकले असून तैवानमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर फिलिपाइन्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि हॉंगकॉंमधून कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. परंतु ९० लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत.
25 Sep 2025 11:31 AM (IST)
पंडित दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते पुढे हाच पक्ष भाजप म्हणून नावारुपास आला. ११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे.
25 Sep 2025 11:31 AM (IST)
मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ओला दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 24, 2025
25 Sep 2025 11:20 AM (IST)
भाजप नेते विनय कटियार यांनी अयोध्येतील मशीदवर विधान केले आहे. यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विनय कटियार म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत मशीद बांधू दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी येथून निघून जावे. एनओसी प्रलंबित असल्याने धन्नीपूर मशिदीच्या योजनेवर स्थानिक प्राधिकरणाच्या आक्षेपाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कटियार यांनी हे विधान केले.
25 Sep 2025 11:10 AM (IST)
“शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू या ठिकाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार त्या अपेक्षा पूर्ण करणार. अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केलेली मदत सर्वांसमोर आहे.आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले.”शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून विरोधी पक्षांनी सुद्धा सर्व मदत केली पाहिजे. सढळ हस्ते मदत करावी, फक्त पर्यटन करु नये” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
25 Sep 2025 10:15 AM (IST)
गायिका रिहाना तिसऱ्यांदा आई झाली आहे. तिने गुरुवारी एका इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी शेअर केली. तिने गोंडस मुलीला हातात धरून हा फोटो शेअर केला आहे. रिहाना तिच्या मुलाचे नाव रॉकी आयरिश मेयर्स ठेवले आहे. तसेच या फोटोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिहानाने २०२२ मध्ये तिचा प्रियकर रॉकीसोबत तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. तिने ऑगस्ट २०२३ मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आता, २०२५ मध्ये, तिने तिच्या तिसऱ्या मुलाच्या जन्माची घोषणा केली आहे.
25 Sep 2025 10:10 AM (IST)
नुकताच ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला आहे. पुरस्कार सोहळ्यातील एका व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. त्यातील एका व्हिडीओनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तो व्हिडीओ आहे शाहरुख खान आणि ‘नाळ २’ चित्रपटामधील बालकलाकार भार्गव जगताप यांचा. शाहरुख खानचा प्रेमळ स्वभाव यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहून शाहरुखचं कौतुक होताना दिसत आहे.
25 Sep 2025 10:05 AM (IST)
भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघांमधील सुरू असलेला वाद कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतीय संघाने आशिया कप लीग सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सने आणि सुपर ४ सामन्यात सहा विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १४ सप्टेंबरच्या सामन्याबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध आयसीसीकडे दोन तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी भारतीय कर्णधाराकडून उत्तर मागितले आहे.
25 Sep 2025 09:59 AM (IST)
इंजिनियरिंगची पदवी पूर्ण केलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) तर्फे ट्रेनी इंजिनियर-I पदांसाठी भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर 2025 आहे.
25 Sep 2025 09:55 AM (IST)
बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघीनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक हटके शो आणला आहे. या शोचं नाव आहे “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हे आहे. याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात सलमान खान आणि आमिर खान पहिले पाहुणे म्हणून सहभागी होताना दिसले आहेत. या शोमध्ये सलमानने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली. आता अभिनेता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
25 Sep 2025 09:50 AM (IST)
भारताच्या संघाचे कालच्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करून फायनल स्थान पक्के केले आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये फलंदाजीला दमदार सुरुवात केली पण शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यासारख्या फलंदाजांनी निराश केले. आज सलग दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी पाकिस्तानशी लढणार आहे. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार लिटन दास हा दुखापतीमुळे सामन्यामध्ये खेळला नाही.
25 Sep 2025 09:45 AM (IST)
भारतात आज 25 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,536 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,574 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,652 रुपये आहे. भारतात काल 24 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,570 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,606 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,678 रुपये होता.
25 Sep 2025 09:40 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहे. त्यातच क्रेडिट विभागात १०० टक्के नोकरी, हमखास २५ ते ३५ हजार पगार अशा आश्वासनांनी एका बनावट बँकिंग अकॅडमीने तब्बल २४ विद्यार्थ्यांना १५ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी ते २३ सप्टेंबर दरम्यान जवाहनगर परिसरातील चेतक घोडा चौकात घडला.
25 Sep 2025 09:36 AM (IST)
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच आता पुढील काही दिवसांत देशाच्या जवळपास अर्ध्या भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारजवळ तयार झालेल्या प्रणालीचा परिणाम पुढील आठवड्यापर्यंत देशाच्या अनेक भागात दिसून येईल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
25 Sep 2025 09:13 AM (IST)
भारताच्या संघाचे कालच्या सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करून फायनल स्थान पक्के केले आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये फलंदाजीला दमदार सुरुवात केली पण शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यासारख्या फलंदाजांनी निराश केले. आज सलग दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी पाकिस्तानशी लढणार आहे. भारताविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार लिटन दास हा दुखापतीमुळे सामन्यामध्ये खेळला नाही.
25 Sep 2025 09:03 AM (IST)
जागतिक बाजारातील कमकुवतपणा लक्षात घेता, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० आज २५ सप्टेंबर रोजी देखील घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. आज शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात तोटा वाढण्याची शक्यता आहे आणि आज शेअर बाजाराची सुरुवात नाकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता आहे.
25 Sep 2025 08:58 AM (IST)
परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुमार नारायण आघाव असे असून तो केवळ २२ वर्षाचा आहे. या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे.
Marathi Breaking Live Updates : पुढील काही दिवसांत देशाच्या जवळपास अर्ध्या भागात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारजवळ तयार झालेल्या प्रणालीचा परिणाम पुढील आठवड्यापर्यंत देशाच्या अनेक भागात दिसून येईल असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उत्तर भारतातील काही भागांमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर, पश्चिमेकडील वारे पूर्वेकडे सरकत आहेत, ज्यामुळे उत्तरेकडील डोंगराळ आणि मैदानी भागात पावसाळा संपत आहे. ही परिस्थिती फार काळ टिकणार नसल्याचा अंदाज आहे. कारण बंगालच्या उपसागरात सतत अनेक प्रणाली विकसित होत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडील वाऱ्यांमुळे वेगाने पुढे येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांमध्ये बदल दिसून येईल.
पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.