पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटल जात. देशभरातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठात तयारी करतात असतात. मात्र एका पठ्ठ्याने थेट विद्यापीठालाच गंडा घातल्याच समोर आल आहे. मी लंडन रिटर्न आहे, एका माजी कुलगुरूच्या नावाने मेसेज केला आणि तुम्हाला एआय रिसर्च आणि ड्रोन रिसर्च प्रकल्पासाठी मदत करतो म्हणून विद्यापीठाला २ कोटी मागितले आणि विद्यापीठाने ते दिलेही. त्यांनतर मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला… तो म्हणजे फसवणुकीचा
कसा उघडकीस आला प्रकार
सितय्या किलारू अस आरोपीच नाव आहे. याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हैदराबादमध्ये जाऊन त्याला अटक करण्यात आली आहे. IIT मुंबईच्या प्राध्यापकाचे नाव वापरून त्याने प्रकल्प मिळवून देण्याच आश्वासन दिल आणि थेट २ कोटीला गंडा घातला. जेव्हा त्याला प्रशिक्षण डेमोसाठी बोलवल तेव्हा तो आला नाही आणि त्या नंतर हा प्रकार उघडकीस आला.
आरोपीची हिस्टरी
आरोपी हा मूळचा विजयवाडाचा आहे. त्याने 2010 मध्ये ई. एन. टी. सी. मधून इंजिनेरींग केली आहे. त्याने 2010 ते 2014 स्टँडफोर्ड युनिव्हसिटी लंडन, यू. के. येथून मास्टर डिग्री केली. त्यानंतर ब्रिमिंगहम युनिव्हर्सिटी लंडन येथून पीएच. डी केली. विशेष म्हणजे त्याने 2019 व 2020 यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा पास केली आहे.
कशी केली फसवणूक ?
मुंबई IIT प्राध्यापकाच नाव आणि नंबर त्याने मेसेज मध्ये दिला होता. पुणे विद्यापीठाला त्याने संपर्क केला आणि माजी कुलगुरूंची नावाने मॅसेज केला. शासनाने मंजूर केलेल्या ड्रोन प्रकल्पासाठी २ टक्के रक्कम द्यावी लागेल अस सांगितलं आणि फसवणूक केली. पुणे पोलिसाच्या सायबर शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. थेट पुणे विद्यापीठालाच गंडा घातल्याने या प्रकरणाची चर्चा होत आहे.
कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण
कामावरून काढल्याचा रागातून दोन मजुरांनी बदला घेण्यासाठी ठेकेदाराच्या मुलीचा अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिला इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये चढवलं. पोलिसांनी काही तासातच तीन वर्षाच्या मुलीची सुटका केली असून आरोपींना अटक केली आहे.