बेकायदेशीररीत्या नेपाळ सीमेवरून (India- Nepal Border) भारतात घुसलेल्या दोन चीनी नागरीकांना एसएसबीच्या जवानांनी अटक (2 Chinese People Arrested) केली. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेजण गेले १५ दिवस दिल्लीत बेकायदेशीररित्या फिरत होते. ते दोघे नेपाळला (Nepal) परतत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीच्या वेळी दोघेही सीतामढीमार्गे भारतात दाखल झाले आणि खासगी कारने दिल्लीला गेल्याचे समोर आले आहे. यादरम्यान सीमेवर गस्त घालणाऱ्या एसएसबीच्या जवानांनी दोघांनाही अटक केली. एसएसबीच्या जवानांनी दोघांना बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
[read_also content=”Video – सिग्नेचर स्टेप्स आणि कमालीची ऊर्जा, गोविंदाच्या नव्या गाण्याचं चाहत्यांकडून कौतुक https://www.navarashtra.com/movies/govinda-showed-signature-moves-in-new-sonf-prem-karun-chhu-nrsr-292022.html”]
लू लांग आणि यूआन हेलांग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. दोन्ही तरुणांकडे नेपाळला गेलेल्या व्हिसा क्रमांक EA5390986 आणि BA9887948 व्यतिरिक्त एक काळे कापड, दोन मोबाईल, मोबाईल पॉवर बँक, विविध कंपन्यांचे अर्धा डझन भारतीय सिम, १०३ डॉलर, पाचशे भारतीय चलन, एटीएम कार्ड, सिगारेट, औषध आणि इकॉनॉमी क्लासचा बोर्डिंग पास आढळून आला आहे.
दोन्ही तरुणांनी पोलीस चौकशीत सांगितले की, ते चीनमधून थायलंडमार्गे काठमांडूला पोहोचले. तेथून ते सायकलने भिथामोड सीमेपर्यंत गेले. भारतीय हद्दीत आल्यानंतर त्यांनी २५ मे रोजी नोएडा येथील जेपी ग्रीन नावाच्या ठिकाणी भाड्याने कार घेतली. दोघे त्यांची दिल्लीतील मैत्रिणी कॅरीकडे गेले. त्यांची मैत्रीण कॅरी नोएडामध्ये मोबाईल फॅक्टरीसह टोन सांग रेन जियान नावाचा गाण्याचा क्लब देखील चालवते. तेथे १५ दिवस राहिल्यानंतर, कारने भिट्टामोरला परत आले.