हरियाणामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू (फोटो- istockphoto)
इंदोरपाठोपाठ हरियाणामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील घटना
आरोग्य विभाग अन् चौकशीवर संशय
हरियाणा राज्यात मोठी घटना घडली आहे. दूषित पाण्याचे (Polluted Water) सेवन केल्याने हरियाणामध्ये तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा जिल्ह्यातील पलवल जिल्ह्यातील छायसा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही दिवस आधी मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. छायसा गावात 15 दिवसांच्या आतमध्ये तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
छायसा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील प्रत्येक घरात कोणी ना कोणी व्यक्ती आजारी आहेच. 12 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 5 निष्पाप शाळकरी मुलांचा समावेश आहे. यामुळे गावामध्ये संतापाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, काही लोकांनी अंगदुखी, सौम्य ताप, खोकला झाल्याची तक्रार केली तेव्हा हा प्रकार समोर आला.
सुरुवातीस हा एक सामान्य हंगामी आजार असल्याचे समजले जात होते. मात्र रूग्णांची प्रकृती अचानक बिघडल्याने काही जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले. मृतांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि तरुणांचा समावेश आहे.
दूषित पाण्यामुळे झाले मृत्यू?
छायसा गावात साधारण 5 हजार लोकवस्ती आहे. या गावात पाणी पुरवठा आणि पाण्याचा निचरा याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावातील अनेक घरांमधील नागरिक भूमिगत पद्धतीने पाण्याची साठवण करतात. दूषित पाणी किंवा पाण्यातून होणारा संसर्ग यामागचे कारण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लवकरच याचा तपास केला जाणार आहे.
Indore Water : इंदूरमध्ये का झाला मृत्यूतांडव? दुषित पाण्याचा चाचणीतून आले धक्कादायक कारण समोर
इंदूरमध्ये का झाला मृत्यूतांडव?
देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरला आता ‘विषारी’ पाण्याने कलंकित केले आहे. दुषित पाण्यामुळे इंदूरमध्ये मृत्यूने तांडव घातला. त्याचबरोबर 1400 लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण देशातून काळजी आणि रोष व्यक्त केला जात आहे. दरम्या, इंदूरमधील या दुषित पाणी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. या संदर्भात पाण्याचे नमुने घेऊन चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये दुषित पाण्यातील बॅक्टेरिया आणि कारणे समोर आली आहेत. मध्य प्रदेशमधील भागीरथपुरा भागात झालेल्या विनाशाचे कारण दूषित पिण्याचे पाणी होते. इंदूरमध्ये आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १,४०० हून अधिक लोक साथीने बाधित झाले आहेत. या पाण्याच्या चाचणीमुळे याचे खरे कारण समोर आले आहे. काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे अशी आपत्ती परिस्थिती निर्माण झाली हे सिद्ध केले आहे.






