केरळ : केरळमधील पथनामथिट्टा येथे दोन महिलांचा बळी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका जोडप्यासह तीन आरोपींना अटक केली. संपत्तीच्या लालसेपोटी या महिलांचा बळी दिल्याची माहिती समोर आली आहे. आधी महिलांची गळा चिरून हत्या करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेहांची तोडफोड करण्यात आली.
केरळमधील पथनमथिट्टा येथे घडलेल्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. येथे एका जोडप्याने दोन महिलांचा बळी दिला. या प्रकरणी पोलिसांनी भगवल सिंग आणि त्यांची पत्नी लैला यांच्यासह तिघांना अटक केली आहे. मोहम्मद शफी असे तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. शफीच्या सांगण्यावरून आरोपी दाम्पत्याने महिलांचा बळी दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी महिलांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
[read_also content=”शंकराच्या सानिध्यात काहीच सामान्य नाही, सर्व काही अलौकिक : मोदी https://www.navarashtra.com/india/nothing-is-ordinary-in-the-presence-of-shankara-everything-is-supernatural-modi-335240.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोडप्याने आधी महिलांची गळा चिरून हत्या केली, नंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर महिलांच रक्त घराच्या भिंतींवर आणि फरशीवर शिंपडलं, जेणेकरून पापे नष्ट होतील आणि घरात संपत्ती येईल. एवढेच नाही तर या जोडप्याने मृतदेहाचे तुकडे शिजवून खाल्ले. आरोपी महिला लैलाने चौकशीदरम्यान सांगितले की, ती आणि तिच्या पतीने विधींच्या नावाखाली घराच्या आत आणि भिंतींवर महिलांचे रक्त शिंपडले. यानंतर आरोपी शफीच्या सांगण्यावरून महिलांचे मृतदेह शिजवून खाण्यात आले. एवढेच नाही तर आरोपींनी या काळात काळ्या जादूशी संबंधित अनेक पुस्तकेही वाचली. महिलांची हत्या करण्यापूर्वी या जोडप्याने त्यांना पलंगावर बांधले आणि नंतर त्यांच्या डोक्यात वार केले. यानंतर दोघांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली.
रोसेलिन आणि पद्मा अशी मृत महिलांची नावे सांगितली जात आहेत. एक महिला जूनपासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. दोघांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दोघे बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत असताना धक्कादायक खुलासे झाले आहे. पद्माला मोहम्मद शफीने तिच्या घरातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शफीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता हे याचा उल़गडा झाला. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण अंधश्रद्धा आणि काळ्या जादूशी संबंधित आहे. दोन्ही महिला रस्त्यावर लॉटरीची तिकिटे विकाण्याच काम करत होती. घरात पैसा यावा आणि जीवनातील त्रासातुन सुटका व्हावी म्हणून दोघांचा बळी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शफीने आरोपी जोडप्याला महिलांचा बळी देण्यास सांगितले होते. जेणेकरून त्यांच्या घरात पैसा आणि संपत्ती येईल. यानंतर या जोडप्याने दोन्ही महिलांची गळा चिरून हत्या केली.